Tamil Nadu beat Baroda: अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात (Syed Mushtaq Ali Trophy 2021 Final) तामिळनाडूने बरोदाचा 7 गडी राखून पराभव केला आहे. यासह तामिळनाडूने दुसऱ्यांदा मुश्ताक अली ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बरोदाच्या संघाने तामिळनाडूच्या गोलंदाजासमोर गुघडे टेकले. बरोदाच्या संघाला 20 षटकात केवळ 120 धावा करता आल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या तामिळनाडूच्या संघाने 18 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या बरोदाच्या संघाने दुसर्या षटकातील पहिल्याच चेंडूवर पहिला विकेट गमावला. पॉवरप्लेच्या शेवटी बरोदाचा स्कोर 28/3 असा होता. संघाला कर्णधार केदार देवधरकडून मोठ्या आशा होत्या, परंतु चौथ्या षटकात तो केवळ 16 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर नवव्या षटकात संघाने केवळ 36 धावांवर 6 विकेट्स गमवल्यानंतर संघ अडचणीत सापडला. दरम्यान, विष्णू सोलंकी आणि अितित सेठ या दोघांनी मिळून सातव्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी करत आपला संघ सावरला. क्वार्टर फायनलमध्ये नाबाद 71 धावांची खेळी करुन आपला संघाला विजय मिळून देणाऱ्या सोलंकीने या सामन्यातही 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर, सेठनेही 29 धावा केल्या. त्यानंतर भार्गव भट्टनेही शेवटच्या पाच चेंडूत 12 धावा ठोकल्या. ज्यामुळे बरोदाच्या संघाला 20 षटकात 120 धावा करता आल्या आहेत. हे देखील वाचा- IPL 2021: आयपीएल चा 14 वा सीजन 11 एप्रिल पासून सुरु होण्याची शक्यता
ट्विट-
D.O.M.I.N.A.N.C.E! 💪👍
The @DineshKarthik-led Tamil Nadu unit beat Baroda by 7⃣ wickets in the #Final and clinch the @Paytm #SyedMushtaqAliT20 title in style at the @GCAMotera. 👏👏 | @TNCACricket
Scorecard 👉 https://t.co/UAB2Z0siQm pic.twitter.com/MARKSY4rLK
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 31, 2021
दरम्यान, 121 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तामिळनाडूने 26 धावांच्या स्कोरवर पहिला विकेट गमावला. हरि निशांत (35) आणि बाबा अपराजितने दुसर्या विकेटसाठी 41 धावा जोडून संघाला मजबूत स्थितीत नेले. त्यानंतर 29 दिनेश कार्तिकने 16 चेंडूत 22 धावा केल्या. तर, दुसऱ्या बाजूला संयमी खेळी करणाऱ्या अपरजितने 29 धावा करत आपल्या संघाल विजय मिळवून दिला.