केएल राहुल, रोहित शर्मा व विराट कोहली (Photo Credit: PTI)

युएई आणि ओमान येथे टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात झाली आहे. विराट कोहलीच्या (Virat Kohli) टीम इंडियाने (Team India) सुपर-12 स्पर्धेपूर्वी आपल्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा  (England) सात विकेटने धुव्वा उडवला. आता पुढील सामना त्यांचा ऑस्ट्रेलियाशी होणार असून 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान (Pakistan) विरोधात हाय-वोल्टेज सामना खेळणार आहे. भारतीय संघातील अनेक खेळाडूंकडून या स्पर्धेदरम्यान चाहत्यांना मोठ्या अपेक्षा असतील. भारताने नेहमीच उत्कृष्ट खेळाडू निर्माण केले आहेत ज्यांनी जगभरातील मोठ्या देशांना धूळ चारली आहे. हे खेळाडू आता पाकिस्तानविरुद्ध संघाच्या विजयाची पायाभरणी करतील. आपण या लेखात ज्या खेळाडूंबद्दल बोलणार आहोत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध  विजयात तो महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. (T20 World Cup 2021 मध्ये टीम इंडियाच्या गेम प्लानवर प्रशिक्षक रवि शास्त्रींनीं केला खुलासा, पहा काय म्हणाले)

केएल राहुल (KL Rahul)

भारतीय संघाचा युवा सलामीवीर राहुलने अनेक मोठ्या स्पर्धेत आपली योग्यता सिद्ध केली आहे. तो खूप आक्रमक खेळाडू आहे आणि जेव्हा तो त्याच्या लयीत येतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजावर भारी पडू शकतो. राहुलने आयपीएल मधील आपला फॉर्म कायम ठेवला आहे. राहुलच्या फॉर्मचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की टी-20 विश्वचषक 2021 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध सराव सामन्यात 24 चेंडूत 51 धावा केल्या, ज्यात 3 उत्तुंग षटकारांचा समावेश होता. टी 20 विश्वचषक 2021 मध्ये राहुल हा फॉर्म कायम ठेवावा अशी संघाला अपेक्षित असेल.

वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy)

आयपीएलमध्ये चक्रवर्तीने आपली ताकद सिद्ध केली. वरुणने आयपीएल 2021 मध्ये आपल्या फिरकीच्या तालावर चांगलेच नाचवले आहे. तो एक रहस्यमय फिरकीपटू म्हणून उदयास आला आहे, ज्याचे चेंडूचा तोड कोणत्याही फलंदाजाला अद्याप मिळालेला नाही. या लेग स्पिनरने 17 सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी 18 महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. इतकंच नाही तर त्याने 6.40 च्या उत्कृष्ट सरासरीने गोलंदाजी केली. हा गोलंदाज पाकिस्तानसाठी खूप धोकादायक ठरू शकतो. वरुणच्या पाकिस्तानविरुद्ध गुगलीचे रहस्य आपल्याला पाहायला मिळेल.

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)

टीम इंडियाच्या या अष्टपैलूचे सर्वच फॅन आहेत. जडेजाने गेल्या काही वर्षांत संघात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने आपल्या गोलंदाजीनेच नव्हे तर फलंदाजीनेही सर्वांना प्रभावित केले. आयपीएल 2021 मध्ये जडेजाने 16 सामन्यात 13 विकेट घेतल्या आणि CSK साठी 227 उपयुक्त धावा केल्या. त्याने डेथ ओव्हर्समध्ये अत्यंत खतरनाक फलंदाजी करत गोलंदाजांना त्रास दिला आहे. जडेजा फिरकी खेळपट्ट्यांवर चांगली गोलंदाजी करतो आणि तो आपल्या लेग स्पिनच्या जादूने सर्वात सर्वत मोठ्या फलंदाजाला देखील गुडघे टेकण्यास भाग पाडू शकतो.