T20 World Cup 2021: चार वर्षानंतर टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत परतणार ‘हा’ टेस्ट एक्स्पर्ट, वर्ल्ड कप संघात होऊ शकतो समावेश
रविचंद्रन अश्विन (Photo Credit: Instagram)

युएई आणि ओमान येथे खेळल्या जाणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची चाहत्यांमध्ये उत्सुकता लागून आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघाने स्पर्धेसाठी आपापले संघ जाहीर केले आहेत. तर बीसीसीआय (BCCI) देखील इंग्लंड (England) विरुद्ध भारत (India) ओव्हल (The Oval) मैदानात खेळल्या जाणाऱ्या चौथ्या टेस्ट सामन्यानंतर भारतीय संघ (Indian Team) जाहीर करणार आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे कसोटी तज्ञ रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) भारताच्या आगामी टी-20 विश्वचषक 2021 संघात (India T20 World Cup Squad) स्थान मिळवू शकतो. अश्विन, जो लाल चेंडूचा तज्ञ आहे, त्याला दुखापतग्रस्त वॉशिंग्टन सुंदरच्या (Washington Sundar) जागी स्थान मिळू शकते. अश्विन अखेर 2017 मध्ये टी-20 सामना खेळला होता त्यानंतर युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवमुळे संघातील स्थान गमवावे लागले होते. सुंदर दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) लवकरच संघाची घोषणा करणार आहे, असे अनेक अहवालात सांगितले गेले आहे. (T20 World Cup 2021 India Squad: भारताच्या टी-20 वर्ल्ड कप संघात कोणत्या खेळाडूंना मिळणार प्रवेश?)

बीसीसीआय मार्की स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघ निवडण्याच्या तयारीत असताना, भारत एका चांगल्या ऑफस्पिनरच्या शोधात असेल आणि तिथेच अश्विन येईल. युजवेंद्र चहलचे एक स्थान निश्चित मानले जात आहे आणि सर्व शक्यतांमध्ये अश्विनला असत देईल. अष्टपैलू रवींद्र जडेजा हा दुसरा पर्याय आहे आणि क्रिकेटच्या सर्वात लहान आवृत्तीत प्रभावी आहे. मध्य-पूर्वे देशात खेळपट्ट्या कोरड्या असण्याची शक्यता आहे आणि फिरकीला मदत करेल. त्यामुळे अश्विनचा अनुभव आणि त्याची विविधता पाहता तो उपयोगी येऊ शकतो. दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेतील पहिल्या चार सामन्यांसाठी आश्विनला वगळल्याबद्दल बरीच चर्चा होत आहे. खेळाच्या जाणकारणांनी असा विश्वास दर्शवला की कोहलीची युक्ती चुकली आहे, परंतु भारतीय कर्णधार त्याच्या निर्णयावर ठाम आहे. अनुभवी भारतीय फिरकीपटू जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे.

दुसरीकडे, अश्विन आयपीएलमध्ये नियमित खेळत आहे. तो चेन्नई सुपर किंग्सनंतर पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स संघासाठी खेळला आहे जिथे त्याने चेंडूने शानदार कामगिरी बजावली आहे. त्याच्याकडे चेंडूने ओमानमधील खेळपट्ट्यांमध्ये उपयोगी पडणारे विविधता आहेत.  अशा स्थितीत अश्विनची भारतीय संघात निवड होते की नाही हे पाहणे मनोरंजक असेल.