पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Photo Credit: PTI)

T20 World Cup 2021 Points Table: टी-20 विश्वचषक (T20 World Cup) सुपर 12 फेरीत आतापर्यंत 7 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये श्रीलंका, इंग्लंड, पाकिस्तान (Pakistan), दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान या संघांनी विजय मिळवला आहे. 26 ऑक्टोबर रोजी गट 1 मध्ये खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिज (West Indies) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात आफ्रिकन संघाने 8 गडी राखून विजय मिळवून आपली स्थिती सुधारली आहे. आता दक्षिण आफ्रिकेला 2 सामन्यांपैकी एक सामना जिंकण्यात यश आले आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिज संघ अडचणीत सापडला आहे. वेस्ट इंडिजचा संघाने सपूर 12 राऊंडरमध्ये आपले दोन्ही सामने गमावला आहेत. यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडला (New Zealand) पराभूत केल्यानंतर पाकिस्तान पुन्हा ग्रुप 2 मध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. किवी संघाविरुद्ध बाबर आजमच्या पाक संघाच्या दणकेबाज विजयानंतर पॉईंट टेबलचे समीकरण बदलले आहे. (T20 World Cup 2021, PAK vs NZ: पाकिस्तानचा विजयरथ सुसाट, शोएब मलिक-असिफ अलीचा संयमी खेळ; सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडला 5 विकेटने लोळवलं)

पाकिस्तानविरुद्ध सलामीच्या सामन्यात पराभवानंतर आता भारतीय संघाला त्यांच्या गटात पहिल्या दोनमध्ये पोहोचायचे असल्यास त्यांना त्यांच्या सर्व सामन्यांमध्ये अप्रतिम कामगिरी करावी लागेल. भारतीय संघाला अजून 4 सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाचा पुढील सामना 31 ऑक्टोबर रोजी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. भारताने 2007 टी-20 विश्वचषक जिंकला होता.  त्यामुळे आता या स्पर्धेतील पुढील सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला तर टीम इंडियासाठी पुढील वाटचाल कठीण होऊ शकते. दुसरीकडे, पाकिस्तानकडून पराभवानंतर न्यूझीलंड जेव्हा भारताविरुद्ध खेळायला उतरेल तेव्हा त्यांच्यावरही दडपण असेल.

दुसरीकडे, पाकिस्तानने गट-2 मधील त्यांचे दोन्ही मोठे सामने जिंकले आहेत आणि त्यांचे उर्वरित तीन सामने अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंड विरोधात होणार आहेत. अफगाणिस्तानने स्कॉटलंडविरुद्ध पहिला सामना जिंकला आहे आणि संघ सध्या गुणतालिकेत भारत आणि न्यूझीलंडच्या वर आहे. परंतु पाकिस्तान ज्या फॉर्ममध्ये दिसत आहे त्यामुळे उर्वरित तीन सामने जिंकण्याची त्यांना आशा आहे आणि असे झाल्यास उपांत्य फेरीतील पाकिस्तानचे तिकीट पक्के होईल. पाकिस्तान 29 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तान, 2 नोव्हेंबर रोजी नामिबिया आणि 7 नोव्हेंबर रोजी स्कॉटलंडविरुद्ध खेळणार आहे.