T20 World Cup 2021: भारत विरुद्ध इंग्लंड Warm-Up सामन्यात ‘या’ खेळाडूंची होणार अग्निपरीक्षा, फ्लॉप खेळीने PAK विरुद्ध होऊ शकतो पत्ता कट
विराट कोहली आणि इयन मॉर्गन (Photo Credit: PTI)

रविवार, 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धेची सुरुवात झाली आहे. एकीकडे पहिल्या फेरीचे सामने खेळले जात असताना, आजपासून सराव सामनेही सुरू होणार आहेत. सोमवार, 18 ऑक्टोबर रोजी आयर्लंड विरुद्ध नेदरलँड्स आणि नामिबिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील ग्रुप ए कॅग पहिला सामना खेळला जाईल. तर दुसरीकडे अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज, इंग्लंड विरुद्ध भारत (ENG vs IND), ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सराव सामने खेळले जातील. भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) सामना संध्याकाळी 7:30 पासून खेळला जाणार आहे. पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध ‘महासंग्राम’पूर्वी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. सराव सामन्यांमध्ये काही खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांच्या नजर असणार आहे. आज, जेव्हा टीम इंडिया (Team India) सराव सामन्यात ब्रिटिश संघाचा सामना करेल, तेव्हा काही खेळाडू असतील जे मोठ्या दबावाखाली असतील. कारण सराव सामन्यातील त्यांची कामगिरी पाकिस्तानविरुद्ध सामन्याच्या संघ निवडीवर होईल. (T20 विश्वचषकपूर्वी Virat Kohli ने रिषभ पंतला दिली चेतावणी, म्हणाला- माझ्याकडे विकेटकीपर भरपूर आहेत; पहा व्हिडिओ)

1. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या सध्या कारकिर्दीतील सर्वात वाईट फॉर्मशी झुंज देत आहे. हार्दिक तंदुरुस्तीमुळे गोलंदाजी करत नसताना बॅटने अपयशी ठरत आहे. अशा स्थितीत संघात त्याच्या निवडीबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आज प्रत्येकाच्या नजरा हार्दिकच्या कामगिरीवर असतील कारण आयपीएलचा दुसरा टप्पा त्याच्यासाठी विशेष काही राहिला नाही. त्याचबरोबर आजच्या सामन्यात हार्दिक गोलंदाजी करतो की नाही हे पाहणेही रंजक ठरेल.

2. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)

भारतीय संघाचा अनुभवी आणि ज्येष्ठ गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील गेल्या काही काळापासून लयीत नाही आहे. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात भुवीच्या गोलंदाजीमध्ये स्विंग दिसला नाही. भुवीला जर पाकिस्तानविरुद्ध सामन्यात संघात स्थान मिळवायचे असेल तर त्याला सराव सामन्यांमध्ये प्रभावी प्रदर्शन करावे लागेल. मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहचे स्थान संघात निश्चित आहे. त्यामुळे भुवीला काहीतरी विशेष करावे लागेल.

3. रिषभ पंत (Rishabh Pant)

पंत सध्या जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक फलंदाज आहेत यात शंका नाही. टेस्ट सामन्यांमध्ये त्याची कामगिरी आश्चर्यकारक ठरली आहे, पण जेव्हा मर्यादित षटकांचा विचार केला जातो, तेव्हा खराब शॉट खेळून पंतला विकेट गमावण्याची सवय झाली आहे. त्याने आयपीएलमध्ये काही प्रभाव पाडला नाही. तसेच ईशान किशन आणि केएल राहुल सारखे संघात आधीच दोन यष्टीरक्षक आहेत. अशा स्थितीत जर पंतची कामगिरी चांगली ठरली नाही तर त्याचा संघातून पत्ता कट होताना दिसत आहे.