IPL 2020: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभूत झाल्यानंतर सनराइजर्स हैदराबाद संघाच्या कर्णधाराने दिली 'अशी' प्रतिक्रिया; पाहा काय म्हणाला? डेव्हिड वार्नर
David Warner (Photo Credit: Twitter)

आयपीएलच्या 13 व्या (IPL-13) हंगामातील तिसरा सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळरू (Royal Challengers Bangalore) आणि सनराइजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) संघ दुबई आंतराराष्ट्रीय मैदानात एकमेकांना भिडला होता. या सामन्यात सनराइजर्स हैदराबादच्या संघाला त्यांच्या पहिल्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाकडून पराभूत झाल्यानंतर सनराइजर्स संघाचा कर्णधार डेव्हिड वार्नरने (David Warner) आपली प्रतिक्रिया दिली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळरूचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलच्या एका ओव्हरने संपूर्ण सामना बदलून टाकला. ज्यामुळे सनराइजर्स पराभव झाला आहे, असे, डेव्हिड वार्नर म्हणाला आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळरूच्या प्रथम फलंदाजी करत सनराइजर्स हैदराबादच्या संघासमोर 20 ओव्हरमध्ये 164 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, या लक्ष्याचे पाठलाग करत असताना सनराइजर्स हैदराबादच्या संघ 153 धावांवर सर्व बाद झाला.

या सामन्यात जॉनी बेयरस्टो जो पर्यंत मैदानात होते, तोपर्यंत हैदराबादच्या संघाचा विजय पक्का वाटत होता. मात्र, युजवेंद्र चहलने 16 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करत असताना दुसऱ्याच चेंडूवर बेयरस्टोला माघारी धाडले. त्यानंतर पुढच्या चेंडूवर चहलने विजय शंकरला बोल्ड केले. या सामन्यात बेयरस्टोने 61 धावा ठोकल्या. तर, चहलने 18 धावा देऊन 3 विकेट पटकावले आहेत. आमच्यासाठी हा सामना अनोखा ठरला. आम्हाला माहिती होते की, बंगळरूकडे अखेरच्या ओव्हरसाठी उत्तम गोलंदाज आहेत. मात्र, चहलचा अखरेची ओव्हर सामना बदलवून टाकणारी ठरली, असे मत डेव्हिड वार्नरने व्यक्त केले.  हे देखील वाचा- Andre Russell Demolishes A Camera: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल याने सरावदरम्यान चक्क कॅमेऱ्याच फोडला; पाहा व्हिडिओ

सनराइजर्स हैदराबादच्या संघाचा दुसरा सामना आता शनिवारी कोलकात नाईट राईडर्सशी खेळला जाणार आहे. यावरही डेव्हिड वार्नरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या सामन्यात जे झाले ते आम्ही बदलू शकत नाही. मात्र, अबुधाबीमध्ये होणाऱ्या पुढील सामन्यात आम्हाला चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. ते गुणतालिकेविषयी बोलत होते. परंतु, खेळाडूंना माहिती आहे की, त्यांना काय करायचे आहे, असा डेव्हिड वार्नर म्हणाला आहे.