Sunil Narine Bowling Action Cleared: KKRसाठी खुशखबर, सुनील नारायणच्या गोलंदाजी शैलीला नियमन समितीने दाखवला हिरवा कंदील
सुनील नारायणची बॉलिंग अ‍ॅक्शन (Photo Credits: IANS)

Sunil Narine Bowling Action Cleared: कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) फिरकी गोलंदाज सुनील नारायणची (Sunil Narine) अबू धाबी येथे झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध (Kings XI Punjab) सामन्यात त्याची गोलंदाजी शैली संशयास्पद आढळली होती, मात्र आता सनरायजर्स हैदराबादविरुद्ध इंडियन प्रीमिअर लीग (Indian Premier League) सामन्यापूर्वी केकेआरला मोठा दिलासा मिळाला आहे. नारायणने शेवटच्या ओव्हरमध्ये शिस्तबद्ध गोलंदाजी करत केकेआरला रोमांचक विजय मिळवून दिला होता, पण सामना संपल्यानंतर त्याची गोलंदाजीची शैली संशयास्पद असल्याचं निरीक्षण ऑन-फिल्ड पंचांनी नोंदवलं. सामन्यात फिरकीपटूंची गोलंदाजीची शैली आक्षेपार्ह असल्याचा अहवाल पंचांनी दिली असल्याचे बीसीसीआयने (BCCI) आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते. परंतु नुकतेच त्याला नियमन समितीने गोलंदाजी शैलीबाबत हिरवा कंदील दिला आहे. नारायणची गोलंदाजी संशयास्पद आढळल्यावर त्याला पुढील दोन सामन्यांना मुकावे लागले होते. (Sunil Narine Bowling Action: KKRच्या सुनील नारायणची बॉलिंग अ‍ॅक्शन बेकायदेशीर, पुन्हा आढळल्यास आयपीएल 2020 मध्ये गोलंदाजी करण्यापासून होईल निलंबित)

बीसीसीआयने नारायणची गोलंदाजी शैलीला हिरवा कंदील दाखवत निवेदन जाहीर केले आणि म्हटले, “गोलंदाजी नियमन समितीकडे सुनील नरिनच्या गोलंदाजीची अधिकृरित्या चाचणी करण्यात यावी अशी विनंती कोलकाताने केली होती. सुनील नरिनच्या गोलंदाजीच्या शैलीचा तपशीलवार व्हिडीओ या समितीकडे सुपूर्द करण्यात आला होता. त्यानंतर समितीने योग्य पद्धतीने शैली अभ्यास करत त्याची शैली वैध ठरवली आहे.” दरम्यान, नारायणची गोलंदाजी शैली संशयास्पद आढळल्याच्या तक्रारीनंतर नियमानुसार त्याच नाव ‘वॉर्निंग लिस्ट’मध्ये टाकण्यात आलं होतं जे आता त्यातून काढण्यात आलं आहे. यानंतर नारायण आता केकेआरच्या आगामी सामन्यांमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होऊ शकतो. यापूर्वी नाईट रायडर्सने म्हटले होते की जेव्हा कॅरेबियन गोलंदाजी शैलीची नोंद झाली तेव्हा ते आणि गोलंदाज दोघेही आश्चर्यचकित झाले होते.

नारायणची गोलंदाजीची शैली बर्‍यादात राहिली आहे. त्याच्या गोलंदाजीची कृती पहिले 2014 मध्ये नोंदली गेली. 2014 चॅम्पियन्स लीग दरम्यान दोनदा नारायणच्या गोलंदाजी शैलीची नोंद केली गेली आणि यामुळे त्याला 2015 वर्ल्ड कप स्पर्धेला मुकावे लागले होते. त्यानंतर 2015 मध्ये, आयपीएल दरम्यानही त्याची गोलंदाजी पुन्हा एकदा वादात आली आणि त्यावर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. आयसीसीने एप्रिल 2016 मध्ये नारायणला पुन्हा गोलंदाजीची परवानगी दिली, परंतु तो वेस्ट इंडिजच्या टी-20 वर्ल्ड कप संघात सामील होऊ शकला नाही. यानंतर, 2018 मध्ये पाकिस्तान सुपर लीगदरम्यान त्याच्या गोलंदाजी शैलीची नोंद करण्यात अली होती.