Sunil Gavaskar (File Photo)

क्रिकेटच्या इतिहासात आपल्या विक्रमी रेकॉर्ड्सने ओळख कमावलेल्या सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)  यांनी नुकतंच 34 गरीब मुलांसाठी महागड्या हृदय शस्त्रक्रिया (Free Heart surgeries) मोफत उपलब्ध करून देणार असल्याची मोठी घोषणा केली . गुरुवारी नवी मुंबई इथे 'श्री सत्य साई संजीवनी इंटरनॅशनल सेंटर फॉर चाईल्ड हार्ट केअर' (Shree Satya Sai Sanjeevani International Center For Child Heart Care) या संस्थेच्या उदघाटन प्रसंगी बोलत असताना आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबाना गावस्कर यांनी हा दिलासा दिला आहे. येत्या काही दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी बोलत असताना ,"इतक्या लहान वयात आज अनेक मुलांना हृदयाच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे, या भीषण आजारांवरील उपचार सामाजिक व आर्थिक अडथळे न पाहता देशातील प्रत्येक मूल व कुटुंबापर्यंत पोहचायला हवे. त्यासाठी आता हे सेंटर उघडण्यात आले आहे यातून आपल्या लहानग्यांना जीवनदान देणाऱ्या  अशा सुविधा पुरविण्यात येईल", अशी माहिती सुनील गावस्कर यांनी दिली.  World Heart Day : हार्ट अटॅक जीवावर बेतण्यापूर्वीच ठेवा या ५ गोष्टींचं भान

या सेंटर मध्ये हृदयाशी संबंधित जन्मजात समस्यांचा सामना करणाऱ्या गरीब मुलांवर उपचार करण्यात येतील. याचसोबत आरोग्यसेवेचे सामान्य प्रशिक्षण देऊन अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांना पेड्र्याटिक कार्डियाक समस्यांचे निदान व प्राथमिक उपचार करण्यासाठी तयार केले जाणार आहे. गरोदर महिला, बाळंतीण स्त्रिया व लहान मुलांना यातून फायदेशीर सुविधा उपलब्ध करून देता याव्या हा हेतू आहे. याची सुरवात याच महिन्यात होणाऱ्या पहिल्या पेड्र्याटिक कार्डियाक शस्त्रक्रियेने होणार आहे.

श्री सत्य साईबाबा यांच्या अनेक संस्था जगभरात गरिबांसाठी दर्जेदार आरोग्यसुविधा देण्याचे काम करत आहेत. पश्चिमेकडील देशांमध्ये हे पाहिलंच आर्ट सेंटर सुरु करण्यात आलं असून मोफत आरोग्यसुविधा पुरविण्याचा या संस्थेचा मानस आहे.