Sri Lanka vs New Zealand: श्रीलंका संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा (Lasith Malinga )याने न्युझीलंड विरोधात खेळवण्यात आलेल्या T20 सीरिज मधील शेवटच्या सामन्यात क्रिकेटच्या जगतात इतिहास रचला आहे. मलिंगा याने 4 चेंडूत 4 विकेट्स आणि हॅट्रिक सुद्धा केली आहे. 2007 मध्ये मलिंगा याने एकदिवशीय सामन्यात अशा पद्धतीची उत्तम खेळी केली होती. तर एकदिवशीय सामन्यामधील मलिंगा हा एकमेव खेळाडू आहे ज्याने चार चेंडूत चार विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याने ही कमाल केली आहे. त्यामुळे मलिंगा आता T20 मधील पहिलाच 100 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
मलिंगा याने न्युझीलंड संघातील चार फलंदाज खेळाडूंच्या विरोधात उत्तम खेळी करत त्यांच्या विकेट्स घेतल्या. तिसऱ्या शतकातील तिसऱ्या चेंडूत कोलिन मुनरो याला 12 रनवर क्लीन बोल्ड करण्यात आले. त्यानंतर चौथ्या चेंडूवेळी त्याने जेम्स रदरफोर्ड याला शून्य रनवर LBW आउट केले. तिसरी विकेट ग्रँन्ड होम याची घेत त्याला सुद्धा शून्य रनवर क्लीन बोल्ड केले. तर चौथी विकेट त्याने रोल टेलर याची घेत त्याला शून्य रनवर LBW आउट केले.
And that's a 🎩HAT-TRICK for the Twenty20 🐐 Lasith Malinga! NZ 15/3 (2.5) #SLvNZ pic.twitter.com/kycYsircyS
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) September 6, 2019
>>आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान या वर्षात घेतलेल्या 4 चेंडूत 4 विकेट्स:
-Lasith Malinga vs SA, 2007 (ODI)
-Rashid Khan vs IRE, 2019 (T20I)
-LASITH MALINGA vs NZ, Today (T20I)
(आंतरराष्ट्रीय सामन्याच्या एका डावात प्रथमच 12 खेळाडूंनी केली फलंदाजी, वाचा कसे)
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मलिंगा याने पाचव्यांदा हॅट्रिक विकेट्स घेतल्या आहेत. हॅट्रिकची कमाल मलिंगा याने एकदिवशीय सामन्यात तीन वेळेस केली होती. मात्र T20 वेळी दुसऱ्यांदा ही कमाल केली आहे. त्यामुळे वसीम अक्रम याला मागे टाकत लसिथ मलिंगा सर्वात जास्त हॅट्रिक करणारा ठरला आहे. अकरम याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार वेळा हॅट्रिक केली होती.