(फोटो सौजन्य-फेसबुक)

India vs Sri Lanka  ODI Series: कोरोनाच्या कारणास्तव भारत आणि श्रीलंका दरम्यान खेळवली जाणारी सीरिज वेळेवर सुरु होणार नाही आहे. कारण श्रीलंका टीमचे डेटा अॅनालिस्ट आणि बॅटिंग कोच कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. अशातच सीरिजचा कार्यक्रम री-शेड्युल केला जाणार आहे. पहिल्या वनडे सीरिज 13 जुलै पासून सुरु होणार होती. आता ती 17-19 जुलै दरम्यान सुरु केली जाऊ शकते. दौऱ्यावर इंडियाचा संघ तीन वनडे आणि तीन मॅचची सीरिज खेळणार आहे. शिखर धवन यांच्या नेतृत्वाखाली ज्युनियर टीम सुद्धा येथे आली आहे.(IND vs SL 2021: अर्जुन रणतुंगा यांच्या ‘टीम इंडिया दुय्यम दर्जाच्या’ टीकेवर माजी श्रीलंकन दिग्गज क्रिकेटपटूने केला पलटवार)

Cricbuzz च्या बातमीनुसार, श्रीलंका क्रिकेट बोर्ड शनिवारी सीरिजचे नवे शेड्युल जाहीर करु शकतो. शुक्रवारी बोर्डाने असे म्हटले की, डेटा अॅनालिस्ट जीटी निरोशन पॉझिटिव्ह आले आहेत. यापूर्वी बॅटिंग कोच ग्रांट फ्लावर यांना सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. इंग्लंड येथून परतलेल्या टीममधील अन्य खेळाडू सुद्धा क्वारंटाइन आहेत.(IND vs ENG 2021: शुभमन गिलच्या रिप्लेसमेंटवर Sourav Ganguly यांनी सोडले मौन, पाहा काय म्हणाले BCCI अध्यक्ष) 

क्रिकइंफोच्या मते, वनडे च्या तुलनेत 17 जुलै, 19 जुलै आणि 21 जुलै रोजी खेळवले जाऊ शकतात. तर टी20 चे सामने 24 जुलै, 25 जुलै आणि 27 जुलै रोजी होऊ शकतात. यापूर्वी सीरिजची सुरुवात 13 जुलै पासून होणार होती आणि अंतिम सामना 25 जुलै रोजी पार पडणार होता. दरम्यान, बीसीआयने श्रीलंका बोर्डाला पूर्णपणे सहकार्य केले आहे. कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर सुद्धा टीम इंडियाने श्रीलंकेचा दौरा रद्द केलेला नाही.