SRH Vs DC, 47th IPL Match 2020: आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 47 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला (Sunrisers Hyderabad Vs Delhi Capitals) 88 धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबादच्या संघाने 20 षटकात 219 धावांचा डोंगर उभा केला. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ केवळ 131 धावा करू शकला. दिल्लीच्या संघाकडून सर्वाधिक 36 धावा केल्या आहेत. या विजयासह हैदराबादच्या संघाच्या प्ले-ऑफमध्ये जाण्याच्या आपेक्षाही वाढल्या आहेत.
हैदराबादविरूद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकूण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादने तुफान फटकेबाजीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि सलामीवीर वृद्धिमान साहा यांच्या झंजावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी यांच्या बळावर हैदराबादने 20 षटकात 219 धावांचा शिखर उभा केला. हे देखील वाचा- Harbhajan Singh Slams BCCI: ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुर्यकुमार यादव याची निवड न केल्याने हरभजन सिंह याने बीसीसीआयला फटकारले
ट्वीट-
#IPL2020 Match 47: Sunrisers Hyderabad (SRH) beat Delhi Capitals (DC) by 88 runs. pic.twitter.com/qWPtiVIWgW
— ANI (@ANI) October 27, 2020
या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीच्या फलंदाजांनी चाहत्यांची साफ निराशा केली. शिखर धवन शून्यावर माघारी परतला. धावगतीचा विचार करता फलंदाजीत बढती मिळालेला मार्कस स्टॉयनीसदेखील 5 धावा काढून बाद झाला. त्यानंतर अजिंक्य रहाणे(26), हेटमायर (16), श्रेयस अय्यर (7), अक्षर पटले (1) कगिसो रबाडा (3) एका पाठोपाठ बाद झाले. ऋषभ पंतने काही काळ संघर्ष केला, पण त्याला सर्वाधिक 36 धावा काढून माघारी परतावे लागले. त्यानंतर तुषार देशपांडेने थोडी फटकेबाजी केली, पण दिल्लीचा डाव 131 धावांवर आटोपला.