Suryakumar Yadav And Harbhajan Singh (Photo Credits: Twitter/ PTI)

India Tour of Australia 2020–21: बीसीसीआयने (BCCI) सोमवारी ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. आयपीएलच्या तेरावा हंगामाचा अंतिम सामना पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या दौऱ्याला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 4 कसोटी सामने खेळले जाणार आहेत. या दौऱ्यात अनेक नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र, या दौऱ्यात सुर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) निवड न झाल्याने भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंहने (Harbhajan Singh) बीसीसीआयला फटकारले आहे. तसेच निवडकर्त्यांनी सुर्यकुमार यादवच्या रेकॉर्डकडे एकदा नजर टाकावी, असा सल्लादेखील त्यांनी बीसीसीआय दिला आहे.

हरभजन सिंह यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. ज्यात त्याने म्हटले आहे की, मला माहिती नाही की सुर्य कुमार यादवला भारतीय क्रिकेट संघात जागा मिळवण्यासाठी आणखी काय करावे लागेल? तो आयपीएल आणि रणजीत चांगली कामगिरी करत आहे. बीसीसीआयमध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे नियम आहेत. माझी इच्छा आहे की, निवडकर्त्यांनी त्याचे रेकार्ड एकदा तपासून पाहावे. हे देखील वाचा- Sunil Gavaskar On KL Rahul: किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा नेतृत्व करणारा केएल राहुल याचे सुनील गावस्कर यांनी केले कौतूक

हरभजन सिंह याचे ट्विट-

सुर्यकुमार यादवने आयपीएलच्या तेराव्या हंगामात 11 सामने खेळले असून 283 धावा केल्या आहेत. तसेच गेल्या वर्षी आयपीएलमध्ये त्याने 424 धावा केल्या होत्या. सुर्यकुमार यादवने आयपीएलमध्ये 2018 ते 2020 दरम्यान 1 हजार 219 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वोकृष्ट कामगिरी करूनदेखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याची निवड करण्यात आली नाही. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तिन्ही फॉर्मेटमध्ये विराट कोहली संघाचे नेतृत्व करणार आहे. दुखापतीमुळे रोहित शर्माला संघातून बाहेर ठेवण्यात आले आहे. ज्यामुळे टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत केएल राहुलला उप कर्णधार केले आहे. तसेच दुखापतीमुळे इशांत शर्मा यालाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून मुकावे लागले आहे.