कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली आयपीएलची स्पर्धा (IPL 2020) यंदा युएईमध्ये खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे (Kings XI Panjab) नेतृत्व करणारा केएल राहुल(KL Rahul) याचे भारताचे माजी क्रिकेटर सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी कौतूके केले आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला पंजाबचा संघ डगमगताना दिसला. परंतु, मागील 4 सामन्यात चांगले प्रदर्शन करून पंजाबच्या संघाने पुनरागमन केले आहे. पंजाबच्या संघाला यशाचा मार्ग सापडताना दिसतोय. स्पर्धेच्या सुरुवातीला ते काहीसे हरवल्यासारखे खेळत होते. अनेक सामन्यात ते उत्तम खेळले. पण सामना शेवटच्या षटकापर्यंत जायचा आणि तिथे ते कमी पडायचे. पहिल्याच सामन्यात ते सुपर ओव्हरमध्येही पराभूत झाले होते परंतु, केएल राहुलच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट कामगिरी करुन दाखवली आहे, असे सुनिल गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट क्रिकेट लाईव्हच्या कार्यक्रमात म्हटले आहे.
स्पर्धेच्या सुरूवातीस सलग पाच सामन्यात पराभव मिळवल्यामुळे पंजाबचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी होता. परंतु, संघाने पुनरागमन करत पुढील चार सामन्यात विजय मिळवला. पंजाबने त्यांच्या शेवटच्या सामन्यात 126 धावांचा यशस्वी बजाव केला. या सामन्यात केएल राहुल यांनी चांगले नेतृत्व केले. पंजाबचा संघ राहुल कर्णधारपदाच्या भूमिकेत परिपक्व झाला आहे. तसेच अनिल कुंबळे यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कुंबळे यांनी आपल्या कारकिर्दीत फायटर म्हणून कामगिरी बजावली आहे. 2002 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध सामन्यात जखमी झाले असतानाही त्यांनी गोलंदाजी केली होती. हीच भावना पंजाबच्या संघात दिसून येते, असेही सुनील गावस्कर म्हणाले आहेत. हे देखील वाचा- How to Download Hotstar & Watch KKR Vs KXIP Live Match: कोलकाता नाईट राईडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यातील लाईव्ह सामना पाहण्यासाठी हॉटस्टार डाउनलोड कसे करावे? इथे पाहा
केएल राहुलच्या नेतृत्वात किंग्ज इलेव्हन पंजाब सलग पाच सामने गमावल्यानंतर पॉइंट टेबलच्या तळाशी होता, परंतु त्यानंतर त्यांनी सलग चार सामने जिंकले आणि आता दहा गुणांसह ते पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. अजून तीन सामने बाकी आहेत आणि त्याला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे.