नेपाळ क्रिकेट संघ (Photo Credits: Twitter)

दक्षिण आशियाई खेळांच्या (South Asian Games) 2019 च्या चौथ्या सामन्यात नेपाळ (Nepal) आणि भूतानचा (Bhutan) क्रिकेट संघ आज आमने-सामने असेल. नेपाळ आणि भूतान संघातील अंडर-23 टी-20 क्रिकेट सामना नेपाळच्या कीर्तिपूर येथील त्रिभुवन विद्यापीठ आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जाईल. 2019 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेतील नेपाळ विरुद्ध भुतं सामन्याचे विनामूल्य लाईव्ह प्रसारण, ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग आणि लाईव्ह स्कोर शोधत असलेल्या चाहत्यांना येथे सर्व माहिती मिळेल. नेपाळ आणि भूटान हे दोघेही आपापल्या स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात मोठ्या पराभवाचा सामना केल्यानंतर बहु-क्रीडा स्पर्धेतील आपला दुसरा सामना खेळणार आहेत. दरम्यान, लाईव्ह टेलीकास्टच्या पूर्ण माहितीसाठी, विनामूल्य ऑनलाइन लाईव्ह स्ट्रिमिन आणि स्कोअरबद्दलची सर्व माहिती कृपया खाली स्क्रोल करून पहा.

दक्षिण आशियाई गेम्स 2019 च्या पुरुष क्रिकेट स्पर्धेच्या पाच-संघांच्या गुणतालिकेत भूतान अंतिम स्थानावर आहे. श्रीलंका अंडर -23 संघाने स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात त्यांना पराभूत केले आणि नेपाळविरुद्ध विजयासह टूर्नामेंटमध्ये पुनरागमन करण्याच्या निर्धारित असेल. त्यांचा विरोधक नेपाळलाही पहिल्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार पारस खडका याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण आशियाई गेम्सच्या स्पर्धेचे यजमानपद घेतलेल्या नेपाळला श्रीलंकेने 19.1 ओव्हरमध्ये 173 धावांवर ऑल आऊट केले. पण श्रीलंकेला स्कोअरचा पाठलाग करण्यात थोड्या अडचणींचा सामना करावा लागला, पण अखेरीस सहा गडी राखून त्यांनी विजय मिळवला. नेपाळसाठी पहिले टी-20 शतक झळकावणाऱ्या खडका आपल्या संघाला पुनरागमन करून देत विजयाच्या नेण्याची आशा करत असेल. नेपाळ विरुद्ध भूतान सामन्यासाठी संपूर्ण थेट प्रसारण आणि विनामूल्य ऑनलाइन स्ट्रीमिंगबद्दलचा तपशील पाहा:

नेपाळ विरुद्ध भूटान अंडर -23 टी -20 क्रिकेट सामन्यात दक्षिण आशियाई गेम्स 2019 मध्ये भारतीय वेळेनुसार सकाळी 8.45 वाजता आणि स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.00 वाजता सुरु होईल. खेदाची बाब म्हणजे नेपाळ आणि भूतान यांच्यातील अंडर-23 टी-20 क्रिकेट सामना भारतात टीव्हीवर थेट प्रसारित होणार नाही कारण भारतात दक्षिण आशियाई क्रीडा 2019 साठी कोणतेही अधिकृत प्रसारण उपलब्ध नाही. शिवाय, ऑनलाईनवरही सामना पाहायला उपलब्ध नसेल. पण, दक्षिण आशियाई गेम्स 2019 च्या अधिकृत फेसबुक पेजवर नेपाळ विरुद्ध भूतानच्या सामन्याचे अपडेट्स घेऊ शकतात.

पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे दोन्ही संघासाठी चिंता वाढली आहे. श्रीलंका अंडर-23 विरुद्ध झालेल्या पराभवानंतरही नेपाळ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे तर भूतान अंतिम स्थानी आहे.