भारतीय वंशाच्या मुलीच्या प्रेमात पाकिस्तानी क्रिकेटपटू येडापीसा, स्वत:चा देश सोडून 'हा' दिग्गज फिरकीपटू झाला दक्षिण आफ्रिकेचा नागरिक
इमरान ताहिर आणि जेपी डुमिनी (Photo Credit: Twitter)

आयपीएल (IPL) फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स आणि दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) मर्यादित ओव्हर संघाचा प्रमुख सदस्य असलेला इमरान ताहिरची (Imran Tahir) क्रिकेट कारकीर्द दोन दशकांहून अधिक आहे. ताहिरच्या फिरकीची फलंदाजांमध्ये जितकी भीती आहे त्याची प्रेमकहाणी देखील तितकीच शानदार आहे. इमरानने आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी देशाच्या सीमा ओलांडल्या आणि आज तो दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज गोलंदाजांपैकी एक बनला आहे. हो! इमरान ताहिर हा मूळचा पाकिस्तानी (Pakistan) आहे हे फार कमी जणांना माहित असेल. लाहोर (Lahore) येथे जन्मलेल्या इमरानने पाकिस्तानचे अंडर-19 क्रिकेटमध्ये नेतृत्व केले होते पण आपल्या होणारी पत्नी, जी भारतीय वर्षाची दक्षिण आफ्रिकी नागरिक आहे, तिच्या सांगण्यावरून त्याने आपली जन्मभूमी सोडली. (6 Cricketers Who Played For Another Countries: जन्मले एका देशात पण खेळले दुसऱ्या देशासाठी; हे 6 क्रिकेटर कोण आहेत? घ्या जाणून)

ताहिर 1997-98 दरम्यान अंडर-19 पाकिस्तानी टीमसोबत दक्षिण आफ्रिकी दौऱ्यावर गेला होता जिथे त्याची भेट आपल्या होणाऱ्या पत्नी, भारतीय वंशाची सुंदर मॉडेल सुमैया दिलदारशी (Sumaiyya Dildar) झाली. यानंतर काही भेटीगाठीनंतर इमरानने आपल्या प्रेमाची कबुली दिली सुमैयाला पाकिस्तानला येण्यास सांगितले. पण सुमैय्याने दक्षिण आफ्रिका सोडण्यास नकार दिला. अखेरीस इमरानने 2006 मध्ये प्रेमापोटी आपली क्रिकेट कारकीर्द पणाला लावली आणि पाकिस्तान सोडून आफ्रिकेला सुमैय्यासोबत स्थायिक झाला. डर्बन येथे राहणाऱ्या सुमैय्यानेही इमरानशी लग्नानंतर मॉडेलिंग सोडली आणि कौटुंबिक जीवनात व्यस्त झाली. लग्नानंतर इमरानला आफ्रिकी देशाचे नागरिकत्व मिळाले आणि त्याने क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी कसून मेहनत केली ज्याचे फळ आज त्याला मिळत आहे. ताहिरने तीनही क्रिकेट फॉरमॅटमध्ये आफ्रिकी संघाचे प्रतिनिधित्व केले आणि 293 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, इमरान ताहिरने 2019 वर्ल्ड कपनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व कार्यहाचे आणि टी-20 विश्वचषक जिंकण्यास मदत करावी अशी ताहिरची इच्छा आहे. 2011 मध्ये ताहिरने दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यात त्याने पदार्पण केले होते. इमरान ताहिर टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 विकेट्स घेणारा दक्षिण आफ्रिकी गोलंदाज आहे.