इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. सोमवारी, लीगचा सहाव सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स (CSK vs LSG) यांच्यात झाला. 10 संघांसह आयपीएलचा हा दुसरा हंगाम आहे. गेल्या वर्षी या लीगमध्ये दोन नवीन संघ सहभागी झाल्यानंतर त्याचा थरार आणखी वाढला आहे. अशा परिस्थितीत आयपीएल तीन वर्षांनंतर जुन्या होम आणि अवे फॉर्मेटसह परतले आहे. दरम्यान, आयपीएलमधून खेळाडूंना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरूच आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा धक्का बसला आहे. संघाचा धडाकेबाज फलंदाज रजत पाटीदार संपूर्ण हंगामासाठी बाहेर गेला आहे. विशेष म्हणजे या यादीत पाटीदार हे पहिले नाव नाही, आतापर्यंत अनेक मोठी नावे आयपीएलमधून बाहेर पडली आहेत. जाणून घ्या कोणते खेळाडू आयपीएल मधून बाहेर आहेत.
हे खेळाडू आहेत बाहेर
जसप्रीत बुमराह-जॉय रिचर्डसन (मुंबई इंडियन्स)
मुकेश चौधरी-कोयल जेम्सन (चेन्नई सुपर किंग्स)
विल जॅक-रजत पाटीदार (रॉयल चॅलेंजर्स बंगलोर)
ऋषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स)
जॉनी बेअरस्टो (पंजाब किंग्स)
प्रसिद्ध कृष्णा (राजस्थान रॉयल्स)
केन विल्यमसन (गुजरात टायटन्स)
श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे बाहेर
हे सर्व खेळाडू दुखापतीमुळे आतापर्यंत आयपीएलमधून बाहेर आहेत. काही दिवसांपूर्वी रजत पाटीदार आयपीएलमध्ये खेळणार असल्याचे सांगितले जात होते, मात्र आता तो संपूर्ण हंगामातून बाहेर आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे सलामीचा सामना खेळत नाही, पण तो तंदुरुस्त नसल्यास त्याचे नावही या यादीत जोडले जाऊ शकते. (हे देखील वाचा: IPL Points Table 2023: लीगच्या सहाव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने लखनौ सुपर जायंट्सचा 12 धावांनी केला पराभव, 'ही' आहे गुणतालिकेची स्थिती)
एमआय आणि आरसीबीला बसला सर्वाधिक फटका
आयपीएलचा हंगाम सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागत आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूही आता संघर्ष करत आहे. मुंबई इंडियन्सचे स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि जॉय रिचर्डसन हे सीझनमधून बाहेर आहेत, हे दोन्ही खेळाडू मॅच विनर होते पण दोघेही बाहेर आहेत. त्याचवेळी विल जॅक आणि रजत पाटीदार आरसीबीसाठी बाहेर आहेत.