JP Nadda meets officials amid India-Pakistan tensions | X/@DDNewslive)

India-Pakistan War: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा (JP Nadda) यांनी शुक्रवारी त्यांच्या मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी त्यांनी वैद्यकीय व्यवस्थेचा आढावा (Overview of Medical System) घेतला. जेपी नड्डा यांना भारतातील सर्व रुग्णालये आणि आरोग्य सुविधांच्या कामकाजाच्या स्थितीबद्दल माहिती देण्यात आली. ज्यामध्ये आवश्यक औषधे आणि वैद्यकीय पुरवठ्याची उपलब्धता, पुरेशी पायाभूत सुविधा आणि अग्निसुरक्षा उपायांची माहिती समाविष्ट आहे.

जेपी नड्डा यांनी घेतला वैद्यकीय व्यवस्थेचा आढावा -

दरम्यान, जेपी नड्डा यांनी बैठकीत रुग्णवाहिका तैनात करणे, उपकरणे, औषधे, रक्ताच्या बाटल्या आणि उपभोग्य वस्तूंचा पुरवठा यासह वैद्यकीय पुरवठ्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करणे, बेड, आयसीयू आणि एचडीयूच्या बाबतीत रुग्णालयाची तयारी, भीष्म क्यूब्स तैनात करणे, प्रगत मोबाईल ट्रॉमा केअर युनिट्स इत्यादींचा आढावा घेतला.

बैठकीत अधिकाऱ्यांना सल्ला -

तथापि, बैठकीत रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांना आवश्यक औषधे, रक्त, ऑक्सिजन, ट्रॉमा केअर किट इत्यादींचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपत्कालीन प्रतिसाद नेटवर्कला सहयोगी पद्धतीने बळकट करण्यासाठी जिल्हा प्रशासन, सशस्त्र दल आणि डॉक्टर, परिचारिका, पॅरामेडिक्स, खाजगी क्षेत्रातील रुग्णालये, धर्मादाय संस्था इत्यादींच्या प्रादेशिक संघटनांशी समन्वय साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ( नक्की वाचा: BSF ने उधळला जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर घुसखोरीचा दहशतवाद्यांचा प्रयत्न; सात दहशतवादी ठार (Watch Video).  

याशिवाय, जेपी नड्डा यांनी मंत्रालयातील 24x7 नियंत्रण आणि कमांड सेंटरने चालू असलेल्या प्रयत्नांवर लक्ष ठेवावे आणि राज्यांना मदत करावी, असे निर्देश दिले. केंद्रीय आरोग्य मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून सर्व क्षेत्रांमध्ये अखंड आरोग्य सेवा आणि आपत्कालीन प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे.