
INDW vs ENGW 1st T20I 2025: भारतीय महिला क्रिकेट संघाने 28 जून रोजी नॉटिंगहॅममध्ये झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडवर 97 धावांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. स्मृती मानधनाने तिच्या कारकिर्दीतील पहिले टी-20 शतक ठोकले, तर पदार्पण करणाऱ्या श्री चरणीने शानदार फिरकी गोलंदाजी करत इंग्लंडला रोखले. इंग्लंडसाठी हा महिला टी-20 क्रिकेटमधील सर्वात मोठा पराभव ठरला आहे. (हे देखील वाचा: ICC T20 World Cup 2024 Last 5 Overs: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! 29 जून 2024 ला भारताने टी-20 विश्वचषक जिंकून रचला इतिहास; शेवटच्या 5 षटकांचा वाचा थरार)
आयसीसीकडून इंग्लंड संघावर कारवाई – मॅच फीचा 10% दंड
या लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंड संघाला आणखी एक धक्का बसला आहे. स्लो ओव्हर रेटच्या कारणावरून इंग्लंडला सामन्याच्या फीपैकी 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने अधिकृत निवेदनात सांगितले की, एमिरेट्स आयसीसी इंटरनॅशनल पॅनेलच्या मॅच रेफरी हेलेन पॅक यांनी हा निर्णय घेतला आहे. इंग्लंडने निर्धारित वेळेपेक्षा दोन षटके कमी टाकली होती, त्यामुळे हा दंड लागू करण्यात आला.
England have been fined for maintaining a slow over rate during the first T20I against India.https://t.co/TEoPUI2e5R
— ICC (@ICC) June 29, 2025
कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटने चूक मान्य केली
इंग्लंडची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंटने आपली चूक स्वीकारली आहे, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज भासली नाही. आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, खेळाडूंना निर्धारित वेळेत ओव्हर टाकण्यात अपयश आल्यास प्रत्येकी पाच टक्के दंड आकारला जातो.
टीम इंडियाची दमदार सुरुवात – मालिकेतील पुढील सामने
टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्याची जोरदार सुरुवात केली असून, आता दुसरा टी-20 सामना 1 जुलै रोजी होणार आहे. तिसरा सामना 4 जुलै, चौथा 9 जुलै, आणि पाचवा आणि शेवटचा टी-20 सामना 12 जुलै रोजी होईल. त्यानंतर 16 जुलैपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होईल, ज्याचे सामने अनुक्रमे 16, 19 आणि 22 जुलै रोजी खेळवले जातील. टीम इंडिया या दौऱ्यात दोन्ही मालिकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे आणि चाहत्यांचे लक्ष आता उर्वरित सामन्यांवर केंद्रीत झाले आहे.