वाढदिवसानिमित्त शिखर धवन, खलील अहमद यांनी एकत्र येऊन केला डान्स, 'या' मजेदार अंदाजात मानले चाहत्यांचे आभार, पाहा Video
शिखर धवन आणि खालील अहमद (Photo Credit: Twitter/@SDhawan25)

भारतीय संघाचा सलामी फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) आज 34 वर्षाचा झाला आणि आपला वाढदिवस भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमद (Khaleel Ahmed) याच्यासमवेत साजरा केला. दरम्यान, आज फक्त धवनचाच नाही तर खालीलचाही जन्मदिवस आहे. ‘गब्बर’ आणि खलीलला सह खेळाडू आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांना मिळालेल्या सर्व प्रेमासाठी किती कृतज्ञ आहेत हे दाखवण्यासाठी धवनने खलीलसमवेत ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये दोन्ही क्रिकेटपटू डान्स करताना आणि गाणे गाताना दिसत आहे. दुखापतीमुळे धवनला वेस्ट इंडिज (West Indies) विरुद्ध मालिकेतून वगळण्यात आले आहे तर, खालीलने बांग्लादेशविरुद्ध निराशाजनक कामगिरी केल्याने त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. धवनचा संघात समावेश झाला होता पण सय्यद मुश्ताक अली स्पर्धेदरम्यान दुखापतीनंतर त्याच्या जागी संजू सॅमसन याला संघात स्थान देण्यात आले आहे. (IND vs WI T20I 2019: वेस्टइंडीज टी-20 मालिकेमधून शिखर धवन आऊट, संजू सॅमसन याला मिळाले टीम इंडियात स्थान)

धवनने त्याचा आणि खालीलचा डान्स करतानाच व्हिडिओ शेअर करताना गब्बरने कॅप्शनमध्ये लिहिले, "आपल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार! खालील अहमद आणि मी सर्व प्रेमासाठी आभारी आहे. खुश राहा मित्रांनो," धवनने लिहिले. चाहत्यांचे मेसेजेस आभार मानण्यापूर्वी हे दोन क्रिकेटपटू एकमेकांना शुभेच्छा देताना दिसू शकतात.

ट्विटरवर क्रिकेटपटू आणि देशभरातील चाहते एकत्र आले आणि दोंघांना आजच्या खास दिवशीसाठी शुभेच्छा पाठवल्या. भारतासाठी मागील दोन मालिकांमध्ये गोलंदाजीचा प्रभावी कामगिरी न करणाऱ्या खलीलला संघातून वगळण्यात असल्याने तो सध्या घरगुती सर्किटमध्ये प्रभावी कामगिरी करुन लवकरच पुनरागमन करेल अशी आशा आहे. दुसरीकडे, धवनच्या जागी संजूला संघात स्थान देण्यात आले असले तरीही त्याला प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल ही आशा कमी आहे. कारण भारतीय संघ व्यवस्थापनाने रिषभ पंत याला विकेटकीपर म्हणून आणि श्रेयस अय्यर याला चौथ्या क्रमांकावर जवळपास निश्चित केले आहे.