सध्या ऑस्ट्रेलिया (Australia) मोठ्या समस्येने झगडत आहे. त्यांच्या जंगलांमध्ये भीषण आग लागली आहे आणि अनेक प्रयत्न करूनही नियंत्रण मिळवले जात नाही. मात्र, ते विझविण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू आहेत. या आगीमुळे मोठी जंगले नष्ट होत आहेत, तसेच या जंगलांमध्ये उपस्थित सर्व प्राणी आपला जीव गमावत आहेत. दरम्यान, काही ऑस्ट्रेलियन सेलिब्रिटी आपापल्या मार्गाने या समस्येचे निराकरण करण्यासाठी निधी गोळा करण्याचे काम करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न (Shane Warne) ही त्यापैकी एक आहे. वॉर्नने आंतरराष्ट्रीय स्तरावर 1001 विकेट घेतले आहेत आणि तो श्रीलंकाच्या मुथय्या मुरलीधरन याच्या 1347 विकेटनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून 708 गडी बाद केले. अनेक वर्षांपासून त्याने ऑस्ट्रेलियाची पारंपरिक 'बॅगी ग्रीन' कॅप (Baggy Green Cap) परिधान केली आहे, आता तो त्याचा लिलाव करीत आहे. ऑस्ट्रेलियामधील आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पीडितांना मदत करण्यासाठी यामधून मिळणारी रक्कम दान करणे हा त्याचा हेतू आहे. वॉर्नने सोमवारी ऑस्ट्रेलियामधील विनाशकारी बुशफायरमुळे (Bushfire) बाधित झालेल्यांना मदतीसाठी आपल्या आयकॉनिक कॅपचा लिलाव करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर, बोलीची लढाई केवळ दोन तासांत 275,000 डॉलर्सच्या बोलीवर पोचली. (Pakistan Is With Australia! शाहिद अफरीदी याने ऑस्ट्रेलियाच्या बुशफायर दुर्घटनेतील पीडितांसाठी मदतीची ऑफर देत जिंकले Netizens चे मन, पाहा Tweet)
यानंतर 'एम.सी.' नावाच्या सिडनी स्थित व्यक्तीकडून $520,500 इतकी होती. वॉर्नच्या कॅपसाठी सध्याची लागलेली बोली क्रिकेट दिग्गज सर डोनाल्ड ब्रॅडमन यांच्या बॅगी ग्रीन कॅपसाठी अंतिम लिलावात लागलेल्या किंमतीला मागे टाकले आहे. ब्रॅडमनची बॅगी ग्रीन कॅप जानेवारी 2003 मध्ये 4.25 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्समध्ये विकली गेली होती. शुक्रवारी सकाळी 10 वाजता (एईडीटी) बोली बंद होणार असल्याने अंतिम बोलीत कॅपची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे. लिलाव संपल्यानंतर वॉर्नकडून सर्वोच्च बोलीदारास एक ऑटोग्राफिक प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. वॉर्नच्या कॅपने लिलाव रकमेच्या संदर्भात ब्रॅडमनला मागे टाकले नाही तर खेळाच्या इतिहासातील बरीच प्रसिद्ध क्रिकेट मेमोरिबिलियाही मागे पडले आहे. विशेष म्हणजे 2011 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महेंद्र सिंह धोनीने वापरलेली बॅटही मागे राहिली. धोनीची बॅट 100,000 डॉलर्सला विकण्यात आली.
Wow ! This is incredible. Thankyou so so much. Remember auction closes on Friday the 10th of January at 10am Melbourne, Australian time. Not long to go, so please place a bid here. Thankyou so much again for this amazing generosity !!!! https://t.co/S5QTBu3ykk pic.twitter.com/VbNJAQGxlk
— Shane Warne (@ShaneWarne) January 9, 2020
21 वर्षांच्या व्यावसायिक क्रिकेट कारकीर्दीत वॉर्नने अभिमानाने बॅगी ग्रीन कॅप परिधान केली. वॉर्नने ऑस्ट्रेलियाकडून 145 कसोटी सामन्यांत 708 गडी बाद करत श्रीलंकेच्या मुरलीधरनच्या 800 विकेट मागे जागतिक क्रिकेटमध्ये दुसरे स्थान मिळवले. दरम्यान, वॉर्न व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन याच्याही बॅगी ग्रीनकॅपचा लिलावही केला जात आहे. कॅपबरोबरच थॉमसनने आपल्या क्रिकेटचा बनियान लिलावासाठीदेखील दिला आहे.