Pakistan Is With Australia! शाहिद अफरीदी याने ऑस्ट्रेलियाच्या बुशफायर दुर्घटनेतील पीडितांसाठी मदतीची ऑफर देत जिंकले Netizens चे मन, पाहा Tweet
शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Twitter/osmanuzair_pak_crik)

पाकिस्तानचा (Pakistan) माजी क्रिकेटपटू शाहिद अफरीदी (Shahid Afridi) याने पुन्हा एकदा त्याच्या गेस्चरने सोशल मीडियावर यूजर्सचे मन जिंकले. ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण देश हादरला आहे. आतापर्यंत एकूण 24 लोकं याचे बळी पडले आहेत तर हजारो लोक बेघर झाले आहेत. प्रसिद्ध टेनिस खेळाडूंपासून अनेक क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाच्या बुशफायर दुर्घटनेतील पीडितांना मदत करण्याची पुढाकार घेतला आहे. आणि आता यात एक नाव अजून जोडले आहे आणि तो माजी पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार अफरीदी आहे. आफ्रिदी फाउंडेशन (Afridi Foundation) ने ऑस्ट्रेलियन बुशफायर (Australia Bushfire) दुर्घटनेतील पीडितांना मदत करण्याची ऑफर दिली आहे. 45-वर्षीय माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाला हादरवणाऱ्या या घटनेमुळे शोकाकुळ झाला आहे. आफ्रिदी मदतकार्यासाठी आणि गरजूंसाठी खाण्या-पिण्याच्या पुरवठा करण्यास तयार आहेत. (Australia Bushfire: प्रभावित लोकांच्या मदतीसाठी शेन वॉर्न करतोय त्याच्या सर्वात प्रिय वस्तूचा लिलाव, जाणून घ्या)

अफरीदीने ट्विटरवर लिहिले की, “ऑस्ट्रेलियामधील बुशफायर दुर्घटनेमुळे मी खरोखर दु:खी आहे. आम्ही शाहिद आफ्रिदी फाउंडेशन येथे आमचा पूर्ण पाठिंबा देत आहोत आणि आमची ऑस्ट्रेलियामधील फाउंडेशन तातडीने पुरवठा करून मदत कार्यात सहाय्य करेल. आवश्यकतेच्या या घडीत पाकिस्तान ऑस्ट्रेलियासह आहे." आफ्रिदीचे हे गेस्चर ट्विटर यूजर्सचे मन जिंकत आहे.

आफ्रिदीचे ट्विट:

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या या ट्विटवर नेटिझन्सने अश्याप्रकारे दिल्या प्रतिक्रिया:

लाखो लोकांसाठीही आशा

देव तुझं भलं करो

माशाअल्लाह

तुझा अभिमान

छान लाला...

दरम्यान, कीथ अर्बन आणि निकोल किडमॅन सारख्या सेलिब्रिटींनी ऑस्ट्रेलियाला अग्निशमन दलाच्या विरोधात त्यांच्या युद्धात 500 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. प्रसिद्ध गायक कीथ आणि हॉलिवूड स्टार पत्नी निकोल संकट परिस्थितीत देशाबरोबर उभे आहेत. शिवाय, पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी बुश फायर रिकव्हरी फंडात दोनशे कोटी ऑस्ट्रेलियन डॉलर्स (सुमारे एक हजार कोटी रुपये) जाहीर केले आहेत. ऑस्ट्रेलियामधील या अग्नी तांडवामुळे 1300 हून अधिक घरे पूर्णपणे नष्ट झाली आहेत. इतकच नाही तर, 63 लाख हेक्टर वन क्षेत्रही जाळून नष्ट झाले आहे.