Shahid Afridi Praises IPL: शाहिद आफ्रिदी याच्याकडून आयपीएलचे कौतुक, म्हणाला- 'पाकिस्तानी खेळाडूंना खेळायला न मिळणे पाकिस्तानी खेळाडूंचे दुर्भाग्य'
शाहिद आफ्रिदी (Photo Credit: Getty)

मुंबई शहरावर 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंच्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (Indian Premier League) सामील होण्यावर बंदी घालण्यात अली. आयपीएलबद्दल (IPL) बोलताना पाकिस्तान क्रिकेटचे माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) प्रीमियर टी-20 स्पर्धेचे कौतुक केले आणि असे सांगितले की, पाकिस्तानी खेळाडू त्यात खेळत नसल्याने मोठी संधी गमावत आहेत. 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या आवृत्तीत आफ्रिदी, शोएब अख्तर, मिसबाह-उल-हक, युनूस खान, कामरान अकमल इत्यादी पाकिस्तानी स्टार टी-20 स्पर्धेत सहभागी झाले होते. 26/11 दहशतवादी हल्ल्याचा भारत-पाकिस्तान यांच्यात राजकीय संबंधांवर (India-Pakistan Relations) तीव्र परिणाम झाला. त्यानंतर, दोन्ही देशांच्या क्रिकेट टीममध्ये द्विपक्षीय मालिका झाली नाही आणि केवळ बहुराष्ट्र किंवा आयसीसी स्पर्धा दरम्यान दोन्ही देश आमने-सामने येतात. (IPL 2020 Points Table Updated: CSKचा पराभव करत DCने घेतली झेप, जाणून घ्या पॉईंट्स टेबलवर कोणता संघ कितव्या स्थानी)

युएईमध्ये सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या 2020 आवृत्तीच्या पार्शवभूमीवर आफ्रिदीने आयपीएल म्हणजे काय आणि देशातील खेळाडू त्यात न खेळल्यामुळे मोठी संधी गमावत आहेत  याविषयी खुलासा केला. अरब न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आफ्रिदीने म्हटले,"आयपीएल हा एक खूप मोठा ब्रँड आहे आणि बाबर आझम किंवा इतर अनेक पाकिस्तानी खेळाडूंसाठी जाऊन दबावात खेळणे किंवा ड्रेसिंग रूम शेअर करण्याची ही एक चांगली संधी आहे. त्यामुळे माझ्या मते पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये न खेळीने एक मोठी संधी गमावत आहेत." दुसरीकडे, आफ्रिदीने भारतातील आपल्या प्रचंड फॅन-बेसचीही कबुली दिली.

यासंदर्भात तो म्हणाला, "प्रेम म्हणजे प्रेम आहे. नि:संशय, मी ज्या प्रकारे भारतात क्रिकेटचा आनंद लुटला आहे; मी नेहमी भारतीय लोकांकडून मिळवलेल्या प्रेम आणि आदराचे कौतुक केले आहे. आणि आता मी जेव्हा सोशल मीडियावर बोलतो तेव्हा मला भारताकडून अनेक मेसेजेस येतात आणि मी बर्‍याच लोकांना प्रत्युत्तर देतो. भारतातील माझा एकूण अनुभव उत्कृष्ट राहिला माझा असा विश्वास आहे." आफ्रिदी जेंटलमेन्स गेमच्या विविध बाबींवर बोलला आहे आणि त्याने नुकत्याच केलेल्या राष्ट्रीय टीमच्या कामगिरीवर टीका केली. नुकतंच पाकिस्तानने इंग्लंडचा दौरा केला जिथे दोन्ही देशात तीन सामन्यांची कसोटी आणि टी-20 मालिका खेळली गेली.