शाहिद आफ्रिदी आणि वहाब रियाझ (Photo Credit: @GT20Canada/Twitter)

पाकिस्तान संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi), हा अशा खेळाडूंपैकी आहे जो आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने संपूर्ण सामना बदलून टाकू शकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आफ्रिदी सध्या दुसऱ्या देशात छोटे टुर्नामेंट्स खेळात आहे. सध्या तो कॅनडा येथे खेळवण्यात येणाऱ्या ग्लोबल टी-20 लीगमध्ये सहभागी झाला आहे. 39 वर्षीय आफ्रिदीने रविवारी खेळण्यात आलेल्या एडमंटन रॉयल्स (Edmonton Royals) विरुद्ध सामन्यात 10 चौकार आणि 5 षटकार यांच्या सहाय्याने 40 चेंडूत नाबाद 81 धावांची खेळी केली. आफ्रिदी ब्रॅम्प्टन वोल्व्हस (Brampton Wolves) या संघासाठी ग्लोबल टी-20 लीगमध्ये खेळतो. (बेन कटिंग आणि एरिन हॉलंड यांच्यात Yuvraj Singh बनला 'कबाब में हड्डी', विचारला सर्वात महत्वाचा प्रश्न, पहा हे मजेशीर Video)

माजी पाकिस्तानी कर्णधार आफ्रिदीच्या प्रभावी खेळीमुळे लोकांचे चांगलेच मनोरंजन झाले. दुसरीकडे, या सामन्यादरम्यान आफ्रिदीचे देशबांधव वहाब रियाझ (Wahab Riaz) याच्या सोबतचा मैदानावरील संवाद सध्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. वोल्व्हसच्या डावाच्या शेवटच्या चेंडूत आफ्रिदीने एकच धाव घेतली. पण, रियाझने त्याला आणखी एक धाव विचारली, ज्यावर आफ्रिदीने मजेशीर उत्तर दिले आणि म्हणाला की, "तू वेडा आहेस का? मग कोण गोलंदाजी करेल?" या दोंघांमधील हे संभाषण स्टम्प माइकमध्ये रेकॉर्ड झाले.

या सामन्यात आफ्रिदीच्या नाबाद ८१ धावांच्या खेळीसाठी त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. यावर आपली प्रतिक्रिया देत आफ्रिदीने ट्विट करत लिहिले, 'सिंह अजूनही जिवंत आहे'. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील खेळाडू- युवराज सिंह, केन विल्यमसन, ड्वेन ब्राव्हो, डॅरेन सॅमी, ब्रेंडन मॅक्युलम, ख्रिस गेल आणि इतर बरीच नावे या लीगचा एक भाग आहेत.