बेन कटिंग आणि एरिन हॉलंड यांच्यात Yuvraj Singh बनला 'कबाब में हड्डी', विचारला सर्वात महत्वाचा प्रश्न, पहा हा मजेशीर Video
युवराज सिंह, बेन कटिंग आणि एरिन हॉलेंड (Photo Credit: GT20 Canada/Twitter)

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू आणि सिक्सर किंग युवराज सिंह (Yuvraj Singh) आपल्या निवृत्तीनंतर कॅनडा येथील ग्लोबल टी-20 लीग (Global T20 League) मध्ये खेळतो आहे. युवराजने मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. टोरंटो नॅशनल्सचा (Toranto Nationals) कर्णधार असलेला युवीने पहिल्या सामन्यात निराशाजनक खेळीनंतर दमदार कमबॅक केले. ग्लोबल टी-20 लीगमधील आपल्या दुसऱ्या सामन्यात युवीने एडमॉन्टन रॉयल्स (Edmonton Royals) विरुद्ध सामन्यात 21 चेंडूत 35 धावा केल्या. युवीच्या या खेळीच्या जोरावर त्यांच्या संघाने आपला पहिला सामना जिंकला. या सामान्याआधीचा एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे. यात युवराज एका प्रेमी जोडप्याच्या कबाबमध्ये हड्डी बनला. (Global T-20 League: खराब 'पंचगिरी' मुळे युवराज सिंह बाद, ट्विटरवर यूजर्स ने व्यक्त केला संताप)

टोरोंटो नॅशनल्स आणि एडमॉन्टन रॉयल्स यांच्यातील सामन्याआधी रॉयल्सचा बेन कटिंग (Ben Cutting) याची मुलाखत त्याची गर्लफ्रेंड एरिन हॉलेंड (Erin Holland) घेत असताना युवी मधेच या मुलाखतीत घुसला आणि "मग लग्न कधी आहे", असे म्हणत त्यांची खिल्ली उडवली. युवी इथेच थांबला नाही तर मॅच जिंकल्यानंतर जेव्हा हॉलेंडने जेव्हा त्याची मुलाखत घेतली तेव्हा देखील युवीने त्यांची खिल्ली उडवली. या सामन्यादरम्यान युवीला कटिंग याने 35 धावांवर बाद केले. सामन्यानंतरच्या सादरीकरणात युवराजला त्याच्या बाद होण्याबद्दल विचारले असता त्याने देखील आणखी एक हास्यास्पद प्रतिसाद दिला. “बेन कटिंग नावाच्या एका गोलंदाजाने तुम्हाला बाद केले,” असे हॉलंडने विचारले, यावर युवराजने उत्तर दिले, "हो, तो कोण आहे तो तू त्याला ओळखतोस?" हॉलंड म्हणाली, "कल्पना नाही," पार्टी उध्वस्त केली त्याने, "ती पुढे म्हणाली.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्स बरोबर एकत्र खेळल्यामुळे कटिंग आणि युवराज यांच्यात चांगले संबंध आहे. दुसरीकडे, ग्लोबल टी-20 स्पर्धेच्या त्याच्या दुसऱ्या सामन्यात युवीने आक्रमक फलंदाजीकेली आणि फिरकी गोलंदाजांची शाळाच घेतली. पाकिस्तानी फिरकी गोलंदाज शादाब खान याच्या एकाच ओव्हरमध्ये युवीने 2 सिक्स आणि 2 चौकार ठोकले. एडमॉन्टन रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत युवीच्या संघाला 191 धावांचे तगडे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना युवी आणि मनप्रीत गोनी आणि अन्य खेळाडूंच्या दमदार खेळीने टोरंटो नॅशनलने सामना जिंकला.