India Cricket Team (Photo Credit : Getty and Twitter )

India vs Australia 1st Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IndiavsAustralia)  पहिल्या कसोटी सामन्यामध्ये (Test Match)  भारताने विजयी सलामी दिली आहे. तब्बल 71 वर्षांनी भारताने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिला सामना जिंकण्याची किमया केली आहे. त्यामुळे आज भारतीय क्रिकेट संघासोबतच क्रिकेट चाहतेदेखील आनंदामध्ये आहेत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) , व्ही.व्ही.एस लक्ष्मण (VVS Laxman) , हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांनी ट्विटरच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

सचिन तेंडुलकरने ट्विटरच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा दिल्या. मात्र हा सामना पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकरला 2003 सालच्या सामन्याची आठवण झाल्याचं ट्विटमध्ये लिहलं आहे. 2003 साली भारताने अ‍ॅडलेडवर (Adelaide) सामना जिंकला होता. राहुल द्रविड मॅनऑफ द मॅच ठरलेल्या या सामन्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर 4 गडी राखून विजय मिळवला होता.India Vs Australia 1st Test : ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने रचले हे नवे विक्रम

कसोटी सामन्यांच्या या सीरिजमध्ये पुढे अजुन 3 सामने आहेत. पुढचा कसोटी सामाना 14 डिसेंबरपासुन सुरू होईल. पर्थमध्ये हा सामना खेळला जाणार आहे. पर्थमधील खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर असल्याचे तज्ञांचं मत आहे