सचिन तेंडुलकर (Photo Credits: Getty Images)

ऑस्ट्रेलियामध्ये बुशफायर रिलीफ सामन्यासाठी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि कर्टनी वॉल्श (Courtney Walsh) यांची प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली आहे. सचिन पॉटिंग इलेव्हनचा (Ponting XI) प्रशिक्षक असेल, तर वॉल्श वॉर्न इलेव्हनचे (Warne XI) प्रशिक्षक असतील. पीडितांसाठी निधी उभारण्यासाठी आयोजित केलेल्या सामन्यासाठी क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू एकत्र येतील. पुढील महिन्यात 8 फेब्रुवारी रोजी हा सामना खेळला जाईल. या सामन्यात जस्टीन लँगर, अ‍ॅडम गिलक्रिस्ट, ब्रेट ली आणि शेन वॉटसन सहभागी होतील. ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच झालेल्या आग पीडितांसाठी निधी गोळा करण्यासाठी हा सामना आयोजित करण्यात आला आहे. हा निधी ऑस्ट्रेलियाच्या रेडक्रॉस आपत्ती निवारणासाठी जाईल. याबद्दल प्रतिक्रिया देत सचिनने लिहिले की, त्याने “योग्य कारणासाठी” प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे." (ऑस्ट्रेलिया बुशफायर रिलीफ क्रिकेट बॅशसाठी सचिन तेंडुलकर, कर्टनी वॉल्श सज्ज; मास्टर-ब्लास्टर दिसणार नवीन भूमिकेत)

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने सचिनचे आभार मानत त्याने पोस्टमध्ये लिहिले, "सचिनने बुशफायर क्रिकेट बॅशमध्ये भाग घेतला आणि या अभियानासाठी आपला वेळ काढला हे किती महान आहे. प्रशिक्षण देण्यासाठी योग्य संघ निवडले! "पॉन्टिंगने ट्विट केले होते. पॉन्टिंगला उत्तर देताना सचिनने लिहिले, "योग्य संघ निवडला आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे योग्य कारण माझ्या मित्रा. आशा आहे की बुशफायर क्रिकेट बॅश ऑस्ट्रेलियामधील लोकांना आणि वन्यजीवनांना थोडा दिलासा देईल."

बुशफायर पीडितांच्या मदतीसाठी पैसे उभा करण्यासाठी अनेक क्रिकेटपटू, फिरकीचा जादूगार वॉर्न आणि वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांनी त्यांच्या बॅगी ग्रीनचा लिलाव केला. ऑस्ट्रेलियन खेळाडू ख्रिस लिन, ग्लेन मॅक्सवेल आणि डार्सी शॉर्ट यांनीही पीडितांच्या मदतीसाठी चालू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) मारल्या गेलेल्या प्रत्येक षटकारासाठी प्रत्येकी 250 ऑस्ट्रेलियन डॉलर्स देण्याचे जाहीर केले होते. अभूतपूर्व संकटाने जगाला चकित केले आहे आणि सेलिब्रिटी, एथलीटस आणि नेते यांनी पाठिंबा दर्शविला.