कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. यामुळे प्रत्येकजण आपल्या कुटुंबसमवेत वेळ घालवत आहेत. तसेच भारताचे क्रिकेटपटूही आपल्या कुटुंबियांसोबत घरात थांबून सरकारला सहकार्य करत आहेत. दरम्यान, भारताचा तडाखेबाज फंलदाज युवराज सिंह (Yuvraj Singh) याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar), रोहित शर्मा (Yuvraj Singh) आणि हरभजन सिंह (Harbhajan Singh) यांना एक चॅलेंज केला होता. मात्र, युवराज सिंह याने दिलेला चॅलेंज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांनी चक्क डोळ्यावर पट्टी बांधून पूर्ण केला आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी मोठ्या संख्येत पसंती दर्शवली आहे. तसेच या व्हिडिओला अनेकांनी मजेशीर कमेंट देखील दिल्या आहेत.
युवराज सिंह यांनी सचिन तेंडूलकर, रोहित शर्मा आणि हरभजन सिंह यांना आपल्या क्रिकेट बॅटच्या बाजुच्या भागाने काही वेळ बॉल हवेत उडावण्याचा चॅलेंज केला होता. दरम्यान, युवराज सिंह म्हणाला की, मला विश्वास आहे की, सचिन तेंडूलकर ही चॅलेंज पूर्ण करतील. तसेच रोहित शर्मादेखील हे चॅलेंज पूर्ण करू शकतो. मात्र, हरभजन सिंहसाठी हे चॅलेंज थोडे कठीण असल्याचेही तो म्हणाला आहे. हे देखील वाचा- 'भावा, हा तू आहेस?' 'रन-मशीन' विराट कोहली याचा डुप्लिकेट पाहून पाकिस्तानी मोहम्मद अमीर गोंधळला, पाहा Photo
सचिन तेंडूलकर यांचे ट्विट-
I am challenging you back @YUVSTRONG12, but this time with a twist!!👀🙅🏻♂️😉
All I can ask everyone to do is take care and stay safe! pic.twitter.com/px4usxZPkT
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 16, 2020
सचिन तेंडूलकर यांनी चक्क डोळ्यावर पट्टी बांधून हे चॅलेंज पूर्ण केल्यानंतर चाहतेही काहीवेळासाठी थक्क झाले आहेत. त्यानंतर सचिन तेंडूलकर यांनी पुन्हा हे चॅलेंज युवराज सिंहला दिले आणि यामागचे गुपीतही सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे, सचिन तेंडूलकर यांनी आपल्या डोळ्यावर जी पट्टी बांधली होती, ती पारदर्शक होती. अशी माहिती स्वत: सचिन तेंडूलकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून दिली आहे.