सोशल मीडियावर यूजर्सना आश्चर्याचा धक्का देत पाकिस्तानी (Pakistan) वेगवान गोलंदाज मोम्मद आमिर (Mohammad Amir) याने कोरोना व्हायरसमुळे पाकिस्तानमधील लॉकडाउनमध्ये वेब सीरिज पाहताना भारतीय कर्णधार विराट कोहलीचा (Virat Kohli) डुप्लिकेट पहिला असल्याचं म्हटलं आहे. कोरोनामुळे क्रीडा स्पर्धा ठप्प झाल्या आहेत त्यामुळे खेळाडू कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. काही सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात आहेत तर काही चित्रपट, वेब सिरीज पाहण्यात व्यस्त आहेत. मैदानावर भारतीय कर्णधाराविरुद्ध लढाईसाठी ओळखला जाणारा आमिरचे मैदानाबाहेर कोहलीबरोबर चांगले नातं आहे. पाकिस्तानमधील आंशिक लॉकडाउन दरम्यान एक प्रसिद्ध वेब सीरिज पाहताना अमीरची कोहलीच्या ड्युप्लिकेटवर नजर पडली आणि वेगवान गोलंदाजाने सोशल मीडियावर वेब सिरीजचा स्क्रीन-शॉट शेअर करून भारतीय कर्णधाराला 'भावा, हा तू आहेस?' असा प्रश्न विचारला. ('विराट कोहलीपेक्षा बाबर आजम चांगला फलंदाज', इंग्लंडचा फिरकीपटू आदिल राशिदने वर्ल्ड XI मध्ये इयन मॉर्गनला बनवले कर्णधार)
विराटने अद्याप आमिरच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिलेली नाही. विराट आणि त्या पत्रामधील सामान्य पाहून अमीर आश्चर्यकारक साम्य पाहून चकित आणि विचारले, "भावा हा तू आहेस?", मी गोंधळलो. आमिर 2014 मध्ये रिलीज झालेली Dirilis Ertugrul Ghazi ही वेब सिरीज पाहत होता. पाहा हा फोटो:
@imVkohli brother is it you m confused 😂 pic.twitter.com/kbwn31yjT6
— Mohammad Amir (@iamamirofficial) May 15, 2020
दुसरीकडे, यापूर्वी अमीरने रन मशीन कोहलीचे नाव सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून घेतले होते. “पाकिस्तानमध्ये माझे एकंदरीत आवडते सईद भाई आहेत पण जर तुम्ही या युगाबद्दल बोलाल तर तो विराट आहेत. या युगात त्याच्या सामान कोणीही नाही," असे अमीरने सोशल मीडियावरील संवादा दरम्यान म्हटले होते. दरम्यान, बुधवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) जाहीर केलेल्या केंद्रीय कराराच्या यादीतून पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वगळण्यात आला आहे. यादीतून अमीरचे नाव गायब असले तरी युवा प्रतिभावान नसीम शाहने पाकिस्तान संघासह पहिला करार मिळवला. पीसीबी व्यवस्थापनाने उदयोन्मुख पाकिस्तान स्टार हरीस रऊफला इमर्जिंग प्लेयर्स प्रकारात स्थान दिले.