टेंबा बावुमा (Photo Credit: Getty Images)

ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्ध शुक्रवार पासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेआधी दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाला मोठा धक्का बसला आहे. आफ्रिकेचा स्टार सलामी फलंदाज टेंबा बावुमा (Temba Bavuma) हॅमस्ट्रिंग इंजारीमुळे पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे. इंग्लंड (England) विरुद्ध नुकत्याच संपुष्टात आलेल्या अंतिम टी-20 सामन्यात क्षेत्ररक्षण करताना 29 वर्षीय बावुमाला दुखापत झाली. यामुळे त्याला आता वांडरर्स स्टेडियममध्ये होणाऱ्या पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे. क्रिकेट दक्षिण अफ्रीका (CSA) म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत रविवारच्या दुसर्‍या सामन्यात बावुमा पुनरागमन करू शकेल. सध्या सीएसएने 16 सदस्यीय संघात त्याची जागी कोणत्याही खेळाडूची घोषणा केलेली नाही.बावुमाने नुकतंच इंग्लंडविरुद्ध डावाची सुरुवात करून प्रभावी कामगिरी केली आणि 153.75 च्या सरासरीने 123 धावा केल्या होत्या. सुपरस्पोर्ट पार्क येथे इंग्लंडविरुद्ध पाच विकेटने गमावल्या गेलेल्या बावुमाने डावाची सुरुवात करत अवघ्या 24 चेंडूत 49 धावांची वेगवान खेळी केली. (SA vs AUS: टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकी संघ जाहीर; कर्णधारपद सोडल्यानंतर फाफ डु प्लेसिसची टीममध्ये एंट्री)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसचे टीममध्ये पुनरागमन झाले असून विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉक ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिकेत संघाचे नेतृत्व करेल. संघ जाहीर होण्यापूर्वीडु प्लेसिसने टेस्ट आणिटी-20 च्या कर्णधार पदावरून राजीनामा दिला होता. पहिला सामना जोहान्सबर्गमध्ये तर तिसरा सामना केपटाऊनमध्ये 26 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. यानंतर तीन वनडे सामने 29 फेब्रुवारी ते 7 मार्च दरम्यान अनुक्रमे पारल, ब्लोमफॉन्टेन आणि पोटचेस्टरूममध्ये खेळले जातील.

प्रसिद्ध सॅंडपेपरपेपर वादानंतर ऑस्ट्रेलियाचा हा पहिला दक्षिण आफ्रिका दौरा आहे. त्यांच्या संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे दोन अनुभवी खेळाडू (त्यावेळी कर्णधार आणि उपकर्णधार) आहेत, ज्यांच्यावर बॉल टेम्पेरिन्ग प्रकरणात वर्षभरासाठी बंदी घातली गेली होती. या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अ‍ॅरोन फिंच करेल. अखेर ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेत टी-20 मालिका खेळताना 2015-16 मध्ये 2-1 असा विजय मिळविला होता. दुसरीकडे, वनडे मालिकेत दोन्ही संघ 2016-17 मध्ये आफ्रिकेच्या भूमीवर आमने-सामने आले होते. यात यजमानांनी मालिकेत ऑस्ट्रेलियाचा 5-0 ने  होता.