Rohit Sharma (Photo Credit X)

MI vs DC IPL 2025 63rd Match: वानखेडे स्टेडियमवर होणारा आयपीएल 2025 चा 63 वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील खेळवला जाणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे, परंतु दिल्लीसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. जर दिल्ली कॅपिटल्स आज मुंबईला हरवू शकले नाही, तर या हंगामातील त्यांचा प्रवास इथेच संपेल आणि मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चित करेल. तसेच, आज, हिटमॅन रोहित शर्माला (Rohit Sharma) वानखेडेवर एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी असेल. हे देखील वाचा: MI vs DC TATA IPL 2025 Live Streaming: मुंबई आणि दिल्लीसाठी आज करो या मरोचा सामना; लाईव्ह सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?

रोहित नावावर करणार मोठा विक्रम

मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माने आयपीएलमध्ये अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. षटकार मारण्याच्या बाबतीत तो नेहमीच सर्वात आक्रमक आणि विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक मानला जातो. यामुळेच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आज दिल्लीविरुद्ध त्याचे लक्ष्य एक मोठा विक्रम असेल.

रोहित इतिहास रचण्यापासून फक्त 3 षटकार दूर 

जर रोहितने आजच्या सामन्यात तीन षटकार मारले तर तो इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात 300 षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनेल. आतापर्यंत ही कामगिरी जगातील फक्त एकाच खेळाडूच्या नावावर आहे आणि तो आहे वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल, ज्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 357 षटकार मारले आहेत. रोहित केवळ 300 षटकारांचा टप्पा ओलांडणारा पहिला भारतीय फलंदाजच नाही तर आयपीएलच्या एकूण इतिहासात हा टप्पा गाठणारा दुसरा खेळाडूही बनेल.

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

ख्रिस गेल - 357

रोहित शर्मा – 297

विराट कोहली - 290

एमएस धोनी - 264

एबी डिव्हिलियर्स - 251

डेव्हिड वॉर्नर - 236

रोहित शर्मानंतर, विराट कोहली आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा फलंदाज आहे. या हंगामात, कोहली आयपीएलमध्ये त्याचे 300 षटकार देखील पूर्ण करू शकतो. यासाठी कोहलीला 10 षटकारांची आवश्यकता आहे.