
एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) सलग तीन सामने जिंकणाऱ्या भारताचा सामना आज म्हणजेच 19 ऑक्टोबर रोजी बांगलादेशशी (IND vs BAN) होणार आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर रोहितने पुढच्या दोन सामन्यांमध्ये शानदार पुनरागमन केले आहे. आतापर्यंत, रोहित शर्माने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे आणि तो भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज देखील आहे. त्याचवेळी, आज पुन्हा चाहत्यांना रोहितकडून शतकी खेळीची अपेक्षा असेल. (हे देखील वाचा: IND vs BAN ICC World Cup 2023: भारत - बांगलादेश यांच्यात आज होणार रोमांचक सामना, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम)
विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध करणार शतकांची हॅट्ट्रिक
एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात रोहित शर्माने बांगलादेश संघाविरुद्ध सलग दोन शतके झळकावली आहेत. रोहितने 2015 आणि 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये ही कामगिरी केली आहे. 2015 च्या विश्वचषकात रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध 137 धावांची खेळी केली आणि भारताने सामना जिंकला. यानंतर 2019 च्या विश्वचषकातही रोहितने बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. या सामन्यात रोहितने 104 धावांची शानदार खेळी केली. या सामन्यातही टीम इंडियाने शानदार विजय मिळवला होता. आज पुन्हा एकदा रोहित शर्माकडे बांगलादेश संघाविरुद्ध शतक झळकावण्याची सुवर्णसंधी आहे.
View this post on Instagram
दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11
टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश: लिटन दास, तनजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नजमुल हुसेन शांतो, शकीब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहीद हृदोय, महमुदुल्ला, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.