कोलंबो: क्रिकेट जगतात रोहित शर्मा (Rohit Sharma) उत्कृष्ट पुल शॉट्स खेळण्यासाठी ओळखला जातो. एकदा तो क्रीजवर आला की त्याला रोखणे कठीण होते. काही काळापासून त्याने आपला खेळ पूर्णपणे बदलला आहे. तो क्रीजवर येताच आक्रमक सुरुवात करतो, त्यामुळे नंतर फलंदाजीला आलेल्या फलंदाजांना ते अवघड जात नाही. 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतही त्याने अनेक उत्कृष्ट खेळी खेळल्या. तो सर्वात्तम कर्णधार म्हणूनही उदयास आला आहे. गोलंदाजीत चमकदार बदल करतो आणि डीआरएस घेण्यात तज्ञ बनला आहे. भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका (IND vs SL ODI Series 2024) खेळायची आहे. कर्णधार रोहित शर्मा या मालिकेत मोठा विक्रम करू शकतो.
रोहितला पहिल्या क्रमांकावर जाण्याची सुवर्ण संधी
इयॉन मॉर्गन हा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार आहे. त्याने 233 षटकार मारले आहेत. भारताचा कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 231 षटकार मारले आहेत. आता जर रोहितने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत आणखी तीन षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार बनेल. त्यानंतर जगातील सर्व कर्णधारांना मागे टाकून तो पहिल्या क्रमांकावर पोहोचेल.
𝘼𝙡𝙡 𝙞𝙣 𝙧𝙚𝙖𝙙𝙞𝙣𝙚𝙨𝙨 𝙛𝙤𝙧 𝙩𝙝𝙚 𝙊𝘿𝙄𝙨 𝙩𝙤 𝙠𝙞𝙘𝙠 𝙤𝙛𝙛! 🔥#ShubmanGill #RohitSharma #ViratKohli #SLvIND pic.twitter.com/CyDQASJEEh
— OneCricket (@OneCricketApp) August 1, 2024
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारांची यादी:
- इऑन मॉर्गन- 233 षटकार
- रोहित शर्मा- 231 षटकार
- महेंद्रसिंग धोनी- 211 षटकार
- रिकी पाँटिंग- 171 षटकार
- ब्रेंडन मॅक्युलम- 170 षटकार
अनेक सामन्यांमध्ये केले आहे भारताचे नेतृत्व
रोहित शर्माने आतापर्यंत 123 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले असून त्यात त्याने 231 षटकार मारले आहेत. कर्णधार म्हणून रोहितने कसोटीत 21 षटकार, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 105-105 षटकार मारले आहेत. (हे देखील वाचा: Virat Kohli New Milestone: श्रीलंका दौऱ्यावर 'किंग'कोहली करणार मोठा विक्रम, कुमार संगकाराच्या 'या' रेकाॅर्डवर असेल लक्ष्य)
सलामीवीर बनल्यानंतर रोहितची कारकीर्द बदलली
रोहित शर्माने 2007 मध्ये भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही वर्षांत त्याला नावाप्रमाणे कामगिरी करता आली नाही. याच कारणामुळे त्याला 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकातही स्थान मिळाले नाही. त्यानंतर तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्यावर सलामीची जबाबदारी सोपवली. येथूनच रोहितचे करिअर बदलले आणि त्याने मागे वळून पाहिले नाही. गेल्या दशकात तो टीम इंडियासाठी सर्वात मोठा हिरो असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याने भारतासाठी 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10709 धावा केल्या आहेत ज्यात 31 शतकांचा समावेश आहे.