Rohit Sharma (Photo Credit - X)

कोलंबो: टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर सध्या विश्रांतीवर आहे, मात्र तो पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत मैदानात परतणार आहे. या काळात रोहित शर्मा एक मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो. षटकारांच्या बाबतीत तो जगातील इतर फलंदाजांना मागे टाकू शकतो. रोहित शर्मा त्याच्या लांब षटकारांसाठी प्रसिद्ध आहे. त्याने टी-20 आणि वनडे या दोन्ही फॉरमॅटमध्ये भरपूर षटकार मारले आहेत. रोहित शर्माने वनडे फॉरमॅटमध्ये आतापर्यंत एकूण 323 षटकार मारले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो तिसरा फलंदाज आहे. (हे देखील वाचा: IND vs SL T20I Series 2024: श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत हे 3 भारतीय खेळाडू ठरू शकतात गेम चेंजर, आपल्या खेळीने करु शकतात कहर)

ख्रिस गेलचा मोडू शकतो विक्रम

रोहित शर्मा शाहीद आफ्रिदी आणि ख्रिस गेलचा विक्रम मोडू शकतो, या यादीत ख्रिस गेल आणि ख्रिस गेलने आपल्या वनडे करिअरमध्ये एकूण 331 षटकार मारले होते. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर आहे. त्याने एकूण 351 षटकार मारले होते आणि तो सध्या अव्वल स्थानावर आहे. ख्रिस गेलचा विक्रम मोडण्यासाठी रोहित शर्माला आणखी 9 षटकारांची गरज आहे. तर रोहित शर्माला शाहिद आफ्रिदीला मागे टाकून विश्वविक्रम रचण्यासाठी आणखी 28 षटकारांची गरज आहे.

रोहितला सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडण्याची संधी

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्माला शाहिद आफ्रिदीचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडण्याची संधी असेल. रोहित शर्मा असा खेळाडू आहे जो एकदा मैदानात स्थिरावला की 10-15 षटकार ठोकू शकतो. श्रीलंका दौऱ्यावरच शाहिद आफ्रिदीचे विक्रम मोडण्याची क्षमता त्याच्यात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. पहिला सामना 27 जुलै रोजी होणार आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरची ही पहिलीच मालिका असेल. कर्णधार सूर्यकुमार यादवला करण्यात आले आहे. टी-20 मालिका संपल्यानंतर एकदिवसीय मालिका खेळवली जाईल.