T20 World Cup पूर्वी रोहित शर्माने Hardik Pandya साठी दिला इशारा, केले हे विधान
रोहित शर्मा व हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) अष्टपैलू हार्दिक पांड्यासाठी (Hardik Pandya) टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 2021 च्या पहिल्या सामन्यापूर्वी एक चेतावणी जारी केली आहे. भारतीय संघाने (Indian Team) प्रत्येक तयारी पूर्ण केली आहे, पण एक समस्या अजूनही कायम आहे आणि ती म्हणजे हार्दिक दुसऱ्या सराव सामन्यातही गोलंदाजी करू शकला नाही. अशा परिस्थितीत रोहित शर्माने स्पष्ट केले आहे की, हार्दिक पंड्याने पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध सामन्यापूर्वी गोलंदाजीला सुरुवात करावी. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध टीम इंडियाच्या मोहिमेच्या सलामीच्या सामन्यापूर्वी भारतीय सलामीवीर रोहित शर्माने बुधवारी मुंबई इंडियन्स संघातील सहकारी आणि टीम इंडियाचा अष्टपैलू पांड्याच्या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण दिले. हार्दिकबाबत सर्वात मोठ्या प्रश्नाचे उत्तर देताना रोहितने कबूल केले की पांड्याने गोलंदाजी सुरू केली नाही पण भारतीय अष्टपैलू स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात गोलंदाजी करेल अशी अपेक्षा आहे. (T20 World Cup 2021: सराव सामन्यात टीम इंडियाच्या उत्कृष्ट खेळानंतरही विराट-धोनी काळजीत, निर्माण झाल्या तीन मोठ्या समस्या)

“आम्हाला हे सुनिश्चित करायचे आहे की आम्हाला सहावा गोलंदाजीचा पर्याय मिळेल, फलंदाजी क्रमाने काही पर्याय, आम्ही आज त्या सर्व गोष्टींचा प्रयत्न करू. हार्दिक खूप चांगला करत आहे, पण त्याने गोलंदाजी करण्यास थोडा वेळ लागेल. त्याने गोलंदाजी सुरू केली नाही, पण स्पर्धेच्या सुरुवातीसाठी त्याने तयार असले पाहिजे. आमच्याकडे मुख्य गोलंदाजांमध्ये गुणवत्ता आहे, परंतु तुम्हाला सहाव्या गोलंदाजासाठी पर्याय हवा आहे,” रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात नाणेफेक दरम्यान सांगितले. हार्दिकला टी-20 विश्वचषकसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघात अष्टपैलू म्हणून समाविष्ट करण्यात आले असले तरी, 28 वर्षीय अष्टपैलूने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या टप्प्यात रोहितच्या मुंबई इंडियन्ससाठी एकही षटक टाकला नाही. व्हाईट बॉल फॉरमॅटमध्ये सलामीवीर रोहितला दुसऱ्या सराव सामन्यात कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा कर्णधार नियुक्त करण्यात आले. इतकंच नाही तर या सामन्यात रोहितने विराट कोहलीकडून गोलंदाजी करून घेतली पण त्याला एकही विकेट मिळाली नाही.

टीम इंडिया 24 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध टी-20 विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारताने सोमवारी पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून पराभव केला आणि नंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 9 गडी राखून पराभूत केले. या सामन्यात रोहितने नाबाद 60 धावा केल्या, तर सलामीवीर केएल राहुलने 39 धावा आणि सूर्यकुमार यादवने नाबाद 38 धावा केल्या. तसेच हार्दिक पंड्याने 8 चेंडूत 14 धावा करून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.