नुवान कुलसेकरा (Photo Credit: Twitter/RSWorldSeries)

Road Safety World Series 2021: नुवान कुलसेकराच्या (Nuwan Kulasekara) पाच विकेटमुळे श्रीलंका लेजेंड्स (Sri Lanka Legends) संघाला दक्षिण आफ्रिका लेजेंड्सवर (South Africa Legends) रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या रोड सेफ्टी सिरीजच्या (Road Safety Series) दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात 8 विकेटने विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला जिथे त्यांचा सामना आता सचिन तेंडुलकरच्या इंडिया लेजेंड्स (India Legends) संघाशी होईल. श्रीलंका लेजेंड्सने 126 धावांचे लक्ष्य अवघे 16 चेंडू शिल्लक असताना गाठले. चिंतका जयसिंगेने नाबाद 47 आणि उपुल थरंगास यांनी नाबाद 39 धावांच्या खेळीने तिसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केली व श्रीलंकेने 17.2 ओव्हरमध्ये दोन विकेट गमावून 129 धावांचे लक्ष्य गाठले. यापूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशानने नाणेफेक जिंकून पहिले क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने 25 धावांवर पाच विकेट गमावल्या आणि कुलसेकरा हा मुख्य कामगिरी करणारा प्रमुख ठरला. (Road Safety World Series 2021: ‘सिक्सर किंग’ Yuvraj Singh याचे खणखणीत 4 षटकार, दक्षिण आफ्रिका लेजेंड्स गोलंदाजांची घेतली क्लास)

दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर मोर्ने व्हॅन विकने 57 चेंडूंत आठ चौकारांसह अर्धशतक झळकावले. श्रीलंका लेजेंड्ससाठी उपुल थरंगाने 44 चेंडूत पांच चौकार खेचत नाबाद 39 धावा, कर्णधार तिलकरत्ने दिलशानने 18, सनथ जयसूर्या 18 आणि चिंताका जयसिंगे यांनी 25 चेंडूत आठ चौकार आणि एका षटकारासह नाबाद 47 धावा फटकावल्या. दक्षिण आफ्रिका लेजेंड्ससाठी मखाया एनतिनी आणि अल्व्हिरो पीटरसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. 126 धावांचा पाठलाग करताना श्रीलंका लेजेंड्सची सुरुवात खराब झाली आणि कर्णधार तिलकरत्ने दिलशान तिसर्‍या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर 18 धावा करून बाद झाला. तथापि, थरंगाने आपला शानदार फॉर्म कायम ठेवला आणि पुन्हा एकदा एक टोकाला धरून संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. दिलशानच्या अष्टपैलू खेळाच्या (नाबाद 61, 4 विकेट) जोरावर श्रीलंका लेजेंड्सने यापूर्वी इंग्लंड संघाविरुद्ध 6 विकेटने विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. त्या सामन्यात दिलशानशिवाय अन्य कोणताही फलंदाज दहाचा आकडा स्पर्श करू शकला नव्हता.

रविवारी अंतिम सामन्यात श्रीलंकेचा सामना इंडिया लीजेंड्सशी होणार असून तेथे पुन्हा एकदा 2011 वर्ल्ड कप फायनलमधील दोन्ही संघांतील सामन्याची पुनरावृत्ती पाहायला मिळेल. मुंबईत खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेला हरवून महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड कप विजेतेपदाचा मान मिळवला होता.