MI vs RCB Head to Head: वानखेडेवर मुंबई इंडियन्स समोर आरसीबीचे आव्हान, आकडेवारीत कोणाचे आहे वर्चस्व; घ्या जाणून
MI vs RCB (Photo Credit - X)

MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये, आज म्हणजेच 11 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (MI vs RCB) यांच्यात 25 वा सामना होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुंबई इंडियन्सच्या घरच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या हंगामात दोन्ही संघ प्रथमच एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. मुंबई इंडियन्स आपला शेवटचा सामना जिंकून मैदानात उतरत आहे तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला त्यांच्या शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या मोसमात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात फक्त एकदाच टक्कर होणार आहे. (हे देखील वाचा: MI vs RCB IPL 2024 25th Match Live Streaming: आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमनेसामने, येथे सामना पाहू शकतात तुम्ही लाइव्ह)

या मोसमात मुंबई इंडियन्सने आतापर्यंत एकूण 4 सामने खेळले आहेत. या कालावधीत मुंबई इंडियन्सला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. त्यांना 3 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही 1 सामना जिंकला असून 4 सामने गमावले आहेत. दोन्ही संघांच्या एकमेकांविरुद्धच्या कामगिरीवर एक नजर टाकूया.

हेड टू हेड रेकॉर्ड

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात आतापर्यंत एकूण 32 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत मुंबई इंडियन्सने 18 सामने जिंकले आहेत, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 14 सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या शेवटच्या हंगामात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी एकमेकांविरुद्ध 1-1 सामने जिंकले होते. दोन्ही संघांमधील सामन्यांमध्ये सर्वाधिक सांघिक धावसंख्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (235) यांच्या नावावर आहे. सर्वात कमी सांघिक धावसंख्येबद्दल बोलायचे झाले तर मुंबई इंडियन्सच्या नावावर (111) नोंद आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पियुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, हार्दिक पंड्या (कर्णधार), रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा , जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड, क्वेना माफाका.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), यश दयाल, विजयकुमार वैश, रीस टोपले, स्वप्नील सिंग, कर्ण शर्मा, हिमांशू शर्मा, राजन कुमार, मोहम्मद सिराज, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मयंक डागर, सुयश प्रभुदेसाई, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, विल जॅक, कॅमेरॉन ग्रीन, टॉम कुरन, मनोज भंडागे, आकाश दीप, रजत पाटीदार, विराट कोहली, दिनेश कार्तिक, सौरव चौहान, अनुज रावत.