RCB Vs DC, IPL 2020: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामन्यात वॉशिंग्टन सुंदर याची उत्कृष्ट कामगिरी; मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याकडून कौतूकाचा वर्षाव
Sachin Tendulkar (Photo Credits: Getty Images)

आयपीएलच्या गेल्या अनेक हंगामात खराब कामगिरी करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळरुच्या संघाला यावर्षी चांगली सुरुवात मिळाली आहे. यंदाच्या हंगामात बंगळरूच्या संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असून तीन सामन्यात विजय मिळवला आहे. तर, एका सामन्यात पराभूत झाले आहेत. गोलंदाजांचा आश्वासाक मारा आणि नवीन खेळाडूंमुळे संघाला मिळालेले स्थैर्य हे बंगळरुच्या संघाचे आतापर्यंतच्या कामगिरीचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जात आहे. तसेच आज दिल्ली विरुद्ध सुरु असलेल्या आपल्या पाचव्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने (Washington Sundar) उत्कृष्ट गोलंदाजी करुन दाखवली आहे. वॉशिंग्टनच्या या कामगिरीमुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

आयपीएल तेराव्या हंगामातील एकोणीसव्या सामन्यात बंगळरूच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात विराट कोहलीने वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजीची संधी दिली. या संधीचे वॉशिंग्टन सुंदरने सोन करून दाखवले आहे. त्याने आपल्या 4 षटकात केवळ 20 धावा दिल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, त्याने या चारही षटक पॉवरप्ले मध्ये टाकले आहेत. या कामगिरीबद्दल भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरनेही त्याचे कौतुक केले आहे. हे देखील वाचा- KXIP vs CSK आयपीएल 2020 सामन्यात जुळला गजब योगायोग; फाफ डु प्लेसिस-शेन वॉटसनच्या सलामी जोडीने रचला इतिहास, मोडला 7 वर्ष जुना रेकॉर्ड

सचिन तेंडूलकर यांचे ट्विट-

आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा ठरणार आहे. या सामन्यातील विजयी संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेणार आहे. महत्वाचे म्हणजे, आयपीएलच्या अखेर गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला अधिक फायदा मिळतो. कारण, सेमीफाईनलमध्ये लढणाऱ्या टॉपच्या दोन संघापैकी पराभूत झालेल्या संघाला आणखी संधी मिळते.