
Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals, TATA IPL 2025 24th Match: इंडियन प्रीमियर लीग 2025 चा 24 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (RCB vs DC) यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर (M.Chinnaswamy Stadium, Bengaluru) खेळवला जात आहे. या हंगामात, आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत आहे. तर, दिल्ली कॅपिटल्सची कमान अक्षर पटेलच्या खांद्यावर आहे. या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी अद्भुत राहिली आहे. दिल्लीने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत आणि सर्व जिंकले आहेत. त्याच वेळी, बंगळुरू संघाने आतापर्यंत चार सामने खेळले असुन 3 सामने जिंकले आहेत आणि 1 मध्ये पराभव पत्करला आहे. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळूरुने दिल्लीसमोर 164 धावांचे लक्षेय ठेवले आहे.
With that start, did you expect RCB to finish with a 160+ total? 🎯https://t.co/nJ8Fe2KoCI #RCBvDC #IPL2025 pic.twitter.com/OGQUY9U6Pv
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) April 10, 2025
टिम डेव्हिडची 37 धावांची स्फोटक खेळी
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या बंगळूरुने 20 षटकात 7 गडी गमावून 163 धावा केल्या. बंगळूरुकडून टिम डेव्हिडने 37 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने 20 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्याशिवाय फिलिप सॉल्ट 37 आणि रजत पाटीदारने 25 धावांचे योगदान दिले. बंगळुरुला हा सामना जिंकण्यासाठी 164 धावा करायच्या आहेत.
कुलदीप यादवने घेतल्या 2 विकेट
दुसरीकडे, मिचेल स्टार्कने दिल्ली कॅपिटल्स संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. दिल्ली कॅपिटल्स संघाकडून गोलंदाजीत विपल निगम आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. दोन्ही संघांना हा सामना जिंकून स्पर्धेत दोन गुण मिळवायचे आहेत.