Ravindra Jadeja (Photo Credit - Twitter)

IND vs WI 1st ODI 2023: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाहुण्या संघाने शानदार कामगिरी करत पाच विकेट्स राखून विजय मिळवला. यासह भारताने तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 1-0 ने जिंकली आहे. या सामन्यात भारतीय संघाची गोलंदाजी उत्कृष्ट होती. संघाच्या वतीने अष्टपैलू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) कॅरेबियन फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. जडेजाने या सामन्यात 3 बळी घेत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. (हे देखील वाचा: IND vs WI 1st ODI: पहिल्या वनडे सामन्यात भारतीय फलंदाजी क्रमात मोठा फेरबदल, वसीम जाफरने शेअर केली मजेदार पोस्ट; पहा ट्विट)

रवींद्र जडेजाने कपिल देवला मागे टाकले

रवींद्र जडेजाने या सामन्यात फक्त 6 षटके टाकली आणि यात त्याने 37 धावांत 3 महत्त्वाचे बळी घेतले. जडेजाने शिमरॉन हेटमायर, रोमेन पॉवेल आणि रोमानिया शेपर्ड यांना आपला बळी बनवले. या सामन्यात 3 विकेट घेत तो वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. कॅरेबियन संघाविरुद्ध त्याच्या 44 विकेट पूर्ण झाल्या आहेत. या प्रकरणात त्याने चॅम्पियन खेळाडू कपिल देवला मागे टाकले आहे ज्याने 43 बळी घेतले होते. या यादीत अनिल कुंबळे (41), मोहम्मद शमी (37) आणि हरभजन सिंग (33) विकेटसह आहेत.

वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमधील भारताचे सर्वात यशस्वी गोलंदाज

1. रवींद्र जडेजा - 44 विकेट्स

2. कपिल देव - 43 विकेट्स

3. अनिल कुंबळे - 41 विकेट्स

4. मोहम्मद शमी - 37 विकेट्स

5. हरभजन सिंग - 33 विकेट्स

सामन्याबद्दल घ्या जाणून

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या वेस्ट इंडिजने पहिल्या 10 षटकांनंतर 53 धावांत 3 विकेट गमावल्या. यानंतर कॅरेबियन संघाची फलंदाजी ढासळली. सतत पडणाऱ्या विकेट्समध्ये कर्णधार शाई होपने सर्वाधिक 43 धावा केल्या आणि संपूर्ण संघ 23 षटकांत गारद झाला. भारताकडून कुलदीप यादवने 4 बळी घेतले.किशन (52) आणि सूर्यकुमार यादव (19) यांच्यामुळे भारताने छोटे लक्ष्य गाठले.