KKR (Photo Credit- X)

DC vs KKR TATA IPL 2025 48th Match: टाटा आयपीएल 2025 (IPL 2025) चा 48 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) यांच्यात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात, कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 14 धावांनी पराभव केला आहे. त्याआधी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या कोलकाताने दिल्लीसमोर 205 धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्लीचा संघ 20 षटकात 9 गडी गमावून 190 धावा करु शकला.

अंगकृष रघुवंशीची 44 धावांची खेळी

प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारित 20 षटकांत चार गडी गमावून 204 धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सडून अंगकृष रघुवंशीने 44 धावांची शानदार खेळी केली. या उत्कृष्ट खेळीदरम्यान, त्याने 32 चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकार मारले. त्याच्या व्यतिरिक्त, रिंकू 36 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हा सामना जिंकण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाला 20 षटकांत 205 धावा करायच्या होत्या.

सुनील नरेनची शानदार गोलंदाजी

त्यानंतक, प्रत्युत्तरात दिल्ली संघाला 20 षटकात फक्त 190धावा करता आल्या. तथापि, एकेकाळी दिल्लीने 13 षटकांत 3 बाद 130 धावा केल्या होत्या. फाफ डू प्लेसिस (62 धावा) आणि अक्षर पटेल (43 धावा) हे सामना सहज जिंकतील असे वाटत होते पण सुनील नारायणने एकाच षटकात दोन बळी घेत परिस्थिती बदलली. नरेनने 4 षटकांत 29 धावा देत 3 बळी घेतले.