Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

Indian Student Found dead in Ottawa: कॅनडामध्ये एका 21 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह (Indian Student Dies) आढळल्याची घटना घडली आहे. पंजाबमधील डेराबासी येथील आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार कुलजीत सिंग रंधावा यांचे सहकारी दविंदर सैनी यांची मुलगी वंशिका सैनी गेल्या अडीच वर्षांपासून ओटावामध्ये उच्च शिक्षण घेत होती. तिचा मृतदेह ओटावा बीच समुद्रकिनाऱ्यावर आढळला आहे. कुटुंबाने हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

सध्या घटनेची चौकशी सुरू आहे. कुटुंबातील सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की वंशिका बारावी पूर्ण केल्यानंतर दोन वर्षांच्या डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी कॅनडाला गेली होती. तिने नुकतीच 18 एप्रिल रोजी तिची परीक्षा दिली. त्यानंतर तिने तेथेच नोकरी सुरू केली होती. 22 एप्रिल रोजी ती तिच्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी घरून निघाली, पण परतली नाही.

तिच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांनी तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण तिचा फोन बंद असल्याने ते चिंतेत होते. 25 एप्रिल रोजी वंशिका आयईएलटीएस परीक्षा देणार होती. परीक्षेनंतर तिच्या मैत्रिणी तिला शोधण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना ती तीन दिवसांनी आढळली समुद्रकिनारी आढळली. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या तपास सुरू आहे. भारतात राहणाऱ्या वंशिकाच्या कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी तिचा खून झाल्याचे म्हटले आहे.