CSK vs PBKS Pitch Report: एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी की गोलंदाजांसाठी अनुकूल?; जाणून घ्या पिच रिपोर्ट

यंदाच्या आयपीएलच्या हंगामात चेन्नईने आतापर्यंत फक्त दोन सामने जिंकले आहेत. जर त्यांना प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना पुढचा प्रत्येक सामना जिंकावा लागेल. आजच्या सामन्याचा खेळपट्टी अहवाल जाणून घेऊ.

CSK vs PBKS Pitch Report: एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी की गोलंदाजांसाठी अनुकूल?; जाणून घ्या पिच रिपोर्ट
MA Chidambaram Stadium, Chennai (Photo Credit-X)

Chennai Super Kings vs Punjab Kings Pitch Report Pitch Report: जगातील सर्वात मोठी आणि महागडी लीग असलेल्या आयपीएलच्या 18 व्या आवृत्तीचा 49 वा सामना आज खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (Chennai Super Kings vs Punjab Kings) यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये आयोजित केला गेला आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जची कमान महेंद्रसिंग धोनीकडे आहे. तर, पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. चेन्नई सुपर किंग्जने या हंगामात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत ज्यात त्यांना फक्त दोन जिंकता आले आहेत आणि 7 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जचा संघ आहे, ज्याने त्यांच्या नऊ पैकी 5 सामने जिंकले आहेत तर 3 सामने गमावले आहेत. चेन्नई सुपर किंग्जसाठी आता सर्व सामने महत्त्वाचे आहेत प्रत्येक सामना त्यांनी जिंकावा लागेल.

चेन्नई संघ सध्या एकूण चार गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानावर आहे आणि त्यांचा नेट रन रेट -1.302 आहे. तर पंजाब किंग्जचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत मजबूत आहे. ते 11 गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत आणि त्यांचा नेट रन रेट 0.177 आहे. चालू आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात एक सामना खेळला गेला आहे, जो पंजाबच्या घरच्या मैदानावर झाला. त्या सामन्यात पंजाब संघाने 18 धावांनी विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब संघांमध्ये 31 सामने खेळले गेले आहेत ज्यात चेन्नईने 16 वेळा विजय मिळवला आहे. तर पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला 15 वेळा हरवले आहे. आजचा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवला जाईल.

एमए चिदंबरम स्टेडियम पिच रिपोर्ट

पाच वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि पाहुणा संघ पंजाब किंग्ज यांच्यातील सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चेपॉक मैदानावर आयपीएल 2025 मध्ये या मैदानावर 5 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 2 सामने जिंकले. तर, फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला. एमए चिदंबरम स्टेडियम फिरकी गोलंदाजांच्या फिरकीसाठी प्रसिद्ध आहे पण यावेळी येथे वेगवान गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे.

चालू हंगामातील इतर सामन्यांमध्ये, कोलकाता-चेन्नई सामना चेन्नईच्या खेळपट्टीवर कमी धावसंख्येचा सामना होता. त्या सामन्यात सीएसकेला फक्त 103 धावा करता आल्या. केकेआरने तो सामना फक्त 2 विकेट गमावून जिंकला. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत या मैदानावर 90 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 51 वेळा विजय मिळवला आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 39 वेळा विजय मिळवला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).