
अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे. अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला साजरी केली जाते. यावर्षी वैशाख शुक्ल तृतीया 30 एप्रिल दिवशी असल्याने हिंदू धर्मीय हा सण साजरा करणार आहे. धार्मिक मान्यतांनुसार, अक्षय्य तृतीयेला जे दान केले जाते ते अक्षय म्हणजे कधीच न संपणारे आहे असे समजले जाते. मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्टांना WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Wishes द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी शुभ कार्य करण्यास कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते. या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता. अक्षय्य तृतीयेला सोने, दागिने, घर, दुकान, गाडी, जमीन, प्लॉट इत्यादी खरेदी करणे फार शुभ ठरते. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून, ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ करून सूर्य देवाची पूजा केल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. Akshaya Tritiya 2025 Rangoli Designs: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरासमोर, अंगणात काढा 'या' खास आणि सोप्या रांगोळी डिझाइन्स (Watch Video).
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा




अक्षय तृतीया हा एक खास दिवस मानला जातो. या दिवशीच भगवान विष्णूने नृसिंहाचा अवतार घेतला असे मानतात. अक्षय तृतीयेला गंगा नदी पृथ्वीवर अवतरली असेही मानले जाते आणि महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धाची सुरुवात अक्षय तृतीयेला झाली अशीही मान्यता आहे. कृषी प्रधान भारत देशात या दिवशी बळीराजा कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा करतो. तर महाराष्ट्रामध्ये चैत्र महिन्यात जी चैत्रगौरीची पूजा करून घरात स्त्रियांना बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतात त्याची सांगता देखील या अक्षय्य तृतीयेच्या सणाच्या निमित्ताने केली जाते.