
Akshaya Tritiya 2025 Rangoli Designs: अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya 2025) सण आनंद आणि समृद्धीशी संबंधित आहे. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. या तारखेपासून शुभ कार्ये सुरू होतात असे मानले जाते. या वर्षी अक्षय्य तृतीयेचा सण 30 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जात आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे.
या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य व्यर्थ जात नाही आणि त्याचे शाश्वत फळ मिळते असे मानले जाते. अक्षय्य तृतीया ही संपत्ती, सौभाग्य आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानली जाते. म्हणूनच हा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या परंपरांसह साजरा केला जातो. सनातन धर्मात कोणत्याही सणाला रांगोळीचे खूप महत्त्व आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही घरासमोर किंवा अंगणात खालील व्हिडिओ पाहून खास रांगोळी (Akshaya Tritiya 2025 Rangoli Designs) काढू शकता.
अक्षय्य तृतीयाला काढायला रांगोळी डिझाइन्स -
जर तुम्हाला अक्षय्य तृतीयेला तुमच्या घराचे प्रवेशद्वार, अंगण किंवा मंदिर सजवायचे असेल तर तुम्ही वरील प्रकारची रांगोळी डिझाइन बनवू शकता. या रांगोळीच्या डिझाईन्स दिसायला खूपच आकर्षक आहेत आणि बनवायलाही सोप्या आहेत. याशिवाय, तुम्ही या दिवशी कलश असलेली रांगोळी डिझाईन्स काढ शकता. ज्यामुळे तुमची रांगोळी अधिक आकर्षक दिसेल.