
Akshaya Tritiya 2025 HD Images: आज देशभरात जैन आणि हिंदू समुदायांसाठी सर्वात शुभ सणांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya 2025) सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. हा दिवस अक्षय किंवा अखा तीज म्हणूनही ओळखला जातो. हिंदू कॅलेंडरमध्ये अक्षय तृतीया हा वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो, कारण असे मानले जाते की या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य किंवा गुंतवणूक अमर्याद समृद्धी आणते.
सनातन धर्मातील लोक मोठ्या भक्तीभावाने अक्षय्य तृतीया साजरी करतात. सामान्य समजुतीनुसार, या दिवशी सोने आणि मालमत्ता खरेदी केल्याने भविष्यात समृद्धी आणि संपत्ती मिळते. या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देण्याची देखील प्रथा आहे. तुम्ही सोशल मीडियावर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी Wishes, Greetings, WhatsApp Status शेअर करून आपल्या मित्र-परिवारास अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देऊ शकता.
सुखसमृद्धीचा सण आला आहे अक्षय तृतीया,
तुम्हा सर्वांना या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हॅपी अक्षय तृतीया

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा !

तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा!

अक्षय तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा!

याशिवाय, महाराष्ट्रात अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांना नैवैद्य दाखवण्याची परंपरा आहे. तथापि, हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे तुम्ही या दिवशी सोने खरेदी, घर खरेदी किंवा इतर शुभ कार्य करू शकता.