
IPL 2025 Chennai Super Kings vs Punjab Kings Weather Report: जगातील सर्वात मोठी आणि महागडी लीग असलेल्या आयपीएलच्या 18 व्या आवृत्तीचा 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (Chennai Super Kings vs Punjab Kings) यांच्यात आज खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईमध्ये एमए चिदंबरम स्टेडियमवर (MA Chidambaram Stadium) आयोजित केला गेला आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. चेन्नई सुपर किंग्जची कमान महेंद्रसिंग धोनीकडे आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी आता सर्व सामने महत्त्वाचे आहेत. प्रत्येक सामना त्यांनी जिंकावा लागेल. त्याआधी तेथील सामन्यादरम्यान हवामान कसे असेल जाणून घेऊयात. पंजाब किंग्जचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. चेन्नई सुपर किंग्जने या हंगामात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत ज्यात त्यांना फक्त दोन जिंकता आले आहेत आणि 7 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्जचा संघ आहे, ज्याने त्यांच्या नऊ पैकी 5 सामने जिंकले आहेत तर 3 सामने गमावले आहेत. CSK vs PBKS Pitch Report: एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी की गोलंदाजांसाठी अनुकूल; जाणून घ्या पिच रिपोर्ट
गुणतालीकेतील स्थान
चेन्नई संघ सध्या एकूण चार गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दहाव्या स्थानावर आहे आणि त्यांचा नेट रन रेट -1.302 आहे. तर पंजाब किंग्जचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत मजबूत आहे. ते 11 गुणांसह पाचव्या स्थानावर आहेत आणि त्यांचा नेट रन रेट 0.177 आहे. चालू आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात एक सामना खेळला गेला आहे, जो पंजाबच्या घरच्या मैदानावर झाला. त्या सामन्यात पंजाब संघाने 18 धावांनी विजय मिळवला. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत चेन्नई आणि पंजाब संघांमध्ये 31 सामने खेळले गेले आहेत ज्यात चेन्नईने 16 वेळा विजय मिळवला आहे. तर पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जला 15 वेळा हरवले आहे. आजचा सामना चेन्नईच्या मैदानावर खेळवला जाईल.
चेन्नईमध्ये हवामान कसे असेल?
आजचा चेन्नई आणि पंजाब यांच्यातील आयपीएल सामना चेन्नईमध्ये होणार आहे. चेन्नईतील हवामानाबद्दल बोलायचे झाले तर, आज दिवसभर ढगाळ वातावरण राहील. सध्या पावसाची शक्यता फक्त 10 टक्के आहे. चेन्नईमध्ये खूप उष्णता आहे. येथील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 29 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. चेन्नईमध्ये भरपूर आर्द्रता असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करू इच्छिल. नंतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला आर्द्रतेमुळे चांगले प्रदर्शन करणे अवघड जाऊ शकते.
एमए चिदंबरम स्टेडियम पिच रिपोर्ट
पाच वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज आणि पाहुणा संघ पंजाब किंग्ज यांच्यातील सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. चेपॉक मैदानावर आयपीएल 2025 मध्ये या मैदानावर 5 सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 2 सामने जिंकले. तर, फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला. एमए चिदंबरम स्टेडियम फिरकी गोलंदाजांच्या फिरकीसाठी प्रसिद्ध आहे पण यावेळी येथे वेगवान गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली आहे.
चालू हंगामातील इतर सामन्यांमध्ये, कोलकाता-चेन्नई सामना चेन्नईच्या खेळपट्टीवर कमी धावसंख्येचा सामना होता. त्या सामन्यात सीएसकेला फक्त 103 धावा करता आल्या. केकेआरने तो सामना फक्त 2 विकेट गमावून जिंकला. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत या मैदानावर 90 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 51 वेळा विजय मिळवला आहे आणि लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 39 वेळा विजय मिळवला आहे.