Ravindra Jadeja इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता
Ravindra Jadeja (Photo Credits: Twitter / ICC)

भारत आणि इंग्लंड (IND Vs ENG) यांच्यात उद्या (4 मार्च) चौथा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जाणार आहे. त्यानंतर 12 मार्चपासून 5 सामन्यांची टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. तर, येत्या 23 मार्चपासून एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. तत्पुर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर दुखापतग्रस्त झालेला भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा (Ravindra Jadeja) एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करण्याची शक्यता आहे. जाडेजा हा दुखापतीतून सावरला आहे. नुकताच जडेजाने ट्विटरवर आपला सराव करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात जाडेजाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्याने ऑस्ट्रेलियामध्येच आपल्या अंगठ्यावर सर्जरी केली होती. त्यानंतर तो भारतात परतला. दुखापतीमुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेबरोबर टी-20 मालिकेलाही मुकावे लागले आहे. मात्र, आता तो दुखापतीतून सावरला आहे. सध्या तो एनसीएमध्ये सराव करत आहे. यामुळे एकदिवसीय मालिकेत तो संघात पुनारागमन करण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- IPL 2021: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबईत आयपीएल चे सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार?

रविंद्र जाडेजाचे ट्वीट-

रविंद्र जडेजा जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. भारतीय संघाच्या विजयात अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याचे मोठे योगदान आहे. जाडेजाने आतापर्यंत 51 कसोटी आणि 168 एकदिवसीय तर, 50 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात त्याने 36.2 च्या सरासरीने 1 हजार 54 धावा केल्या आहेत. यात 1 शतक आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, एकदिवसीय मालिकेत 32 च्या सरासरीने 2 हजार 411 धावा केल्या आहेत. यात 13 अर्धशतकांचा समावेश आहेत. याशिवाय, त्याने खेळलेल्या टी- 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 217 धावा केल्या आहेत.