IPL Trophy  (Photo Credit: Twitter)

IPL 2021:  इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 14 व्या सीजनला एप्रिल महिन्यात सुरुवात होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतु मुंबईत वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे येथे आयपीएलचे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवले जावे या निर्णयाला आता मान्यता दिली गेली आहे. तर सामने खेळवण्यासाठी चेन्नई, बंगळुरु, कोलकाता, अहमदाबाद आणि दिल्ली या ठिकाणांची निवड बीसीसीआयकडून करण्यात आली होती. मात्र आता महाराष्ट्र राज्य सरकारने प्रेक्षकांशिवाय आयपीएलचे सामना खेळवण्यास परवानगी दिल्याने यामध्ये मुंबई या सहाव्या शहराची भर पडली आहे.(Vijay Hazare Trophy 2021: दिल्ली येथे होणार विजय हजारे ट्रॉफीच्या Knockouts सामन्यांचे आयोजन, 7 मार्चपासून होणार सुरुवात)

आयपीएलचे सामने कधी खेळवले जाणार याबद्दल सु्द्धा अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे. मात्र अशी अपेक्षा केली जात आहे की, आयपीएलचा 14 वा सीजन 8 ते 12 एप्रिल दरम्यान सुरु होऊ शकतो. त्याचसोबत मे किवा जून पर्यंत सुद्धा ते खेळवले जाऊ शकतात.(‘ICC World Test Championship फायनलसाठी टीम इंडिया पात्र ठरल्यास Asia Cup 2021 स्थगित होणार’, PCB प्रमुख एहसान मनी यांचे मोठे विधान)

तर 18 फेब्रुवारीला झालेल्या आयपीएल ऑक्शनच्या वेळी फ्रेंचायजीज यांना असे सांगितले गेले होते की, 14 व्या सीजनमधील बहुतांश सामने हे पुणे आणि मुंबईत होऊ शकतात. तर प्लेऑफ मुंबईत खेळवले जाऊ शकतात. परंतु इंग्लड सीरिजच्या तिसऱ्या टेस्ट दरम्यान अहमदाबाद मध्ये गेल्या आठवड्यात एक बैठक झाली. त्यामध्ये बोर्डाचे सचिव जय शाह, कोषाध्यक्ष अरुण धुमळ, आयपीएल गवर्निंग काउंसिलचे अध्यक्ष बृजेश पटेल आणि अंतरिम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंग अमीनसह बीसीसीआयच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती. तसेच मुंबईतील वेन्यू बद्दल ही चर्चा झाली.