फरार नित्यानंद याच्या 'कैलास' देशात जाण्यासाठी रविचंद्रन अश्विन याने विचारला व्हिसा मिळवण्याचा मार्ग, Netizens नी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया
अश्विन आणि नित्यानंद (Photo Credit: Facebook)

बलात्काराचा आरोपी आणि फरार घोषित झालेल्या नित्यानंद (Nithyananda) याने दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोरमध्ये एक बेट विकत घेऊन त्यास हिंदू राष्ट्र म्हणून घोषित केले आहे. नित्यानंदने या देशाचे नाव कैलासा ठेवले आणि त्याची अधिकृत वेबसाइट देखील बनविली आहे. यानंतर भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) याने ट्विट केले आणि विचारले की या देशासाठी व्हिसा मिळण्याची प्रक्रिया काय आहे? अश्विन अनेकदा आपले मत सोशल मीडियावर शेअर करतो. सोशल मीडियावर बर्‍याचदा आपल्या चतुर शैलीने अश्विन नेटकऱ्यांचे मनोरंजन करत असतो. अश्विनच्या चाहत्यांना त्याची ही पुन्हा शैली आवडली आहे, त्यात त्याने वादग्रस्त तांत्रिक नित्यानंदच्या कथित स्थायिक देश 'कैलासा' (Kailaasa) वर भाष्य केले आहे. अश्विनची ही शैली सोशल मीडियावर चांगलीच पसंत केली जात आहे. (भारतातून फरार झालेल्या नित्यानंद बाबाने स्थापन केला नवा देश 'कैलास'; मंत्रिमंडळ, झेंडा, पासपोर्ट असा असेल थाट)

फरार नित्यानंदच्या नव्या देशाच्या बातमीचा आढावा घेत तामिळनाडूच्या गोलंदाजाने लिहिले की, "कैलासाला जाण्यासाठी व्हिसा मिळण्याची काय प्रक्रिया आहे?" नित्यानंदने कर्नाटकात त्याच्यावर दाखल झालेल्या बलात्काराच्या घटनेपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी पासपोर्टविना भारतातून पलायन केले आहे आणि आता त्याने स्वतःचा एक संपूर्ण देश स्थायिक केला आहे, ज्याचे नाव 'कैलासा' आहे. कैलासावरीलअश्विनचे हे ट्विट लवकरच सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आणि तो व्हायरल झाला. कैलासामध्ये इतर देशांप्रमाणेच सर्व सरकारी पदांवर लोकांची नेमणूक करण्यात आली आहे. जसे - पंतप्रधान, कॅबिनेट मंत्री, लष्करप्रमुख आणि इतर. नित्यानंदने आपल्या नवीन देशासाठी त्याने नवीन ध्वज, नवीन राज्यघटना आणि नवीन प्रतीक देखील निश्चित केले आहे. पाहा अश्विनचे हे मजेदार ट्विट:

अश्विनच्या ट्विटनंतर एका चाहत्याने त्याला प्रतिक्रिया दिली आणि लिहिले की, 'व्हिसा नित्यानंद बनवणार. हा त्याचा देश आहे, केवळ त्याच्याद्वारे आपण अर्ज करू शकता आणि तो आपल्यासाठी कागदपत्र देखील करेल. एका यूजरने विचारले की, 'तुम्हाला फक्त फिरायचं आहे की तुम्हाला नागरिकत्व घ्यायचं आहे?' यावरअश्विनने प्रतिसाद देत म्हटले की, "दुहेरी नागरिकत्व भारतात वैध नाही."

पाहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

तोच व्हिसा प्रक्रिया करणार

आत प्रवेश करणे सोपे आहे. बाहेर येणे नाही 

नितीचे उत्तर

अश्विन दुहेरी नागरिकतेवर

काही महिन्यांपूर्वी अहमदाबादजवळ त्याच्या आश्रमात लैंगिक घोटाळा आणि मुलींच्या कथित अत्याचाराच्या बातम्यांनंतर गुजरात पोलिसांनी कोर्टाला सांगितले की नित्यानंद भारतात नाही आहे. कर्नाटक पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नित्यानंदने जामिनाचा फायदा घेऊन 2018 च्या शेवटी देश सोडले. त्याचा पासपोर्ट सप्टेंबर 2018 मध्ये कालबाह्य झाला होता आणि त्याचे नूतनीकरण करण्याची विनंती देखील स्थानिक पोलिसांनी फेटाळली होती.