Ranji Trophy 2022: कोविड-19 प्रकरणांमुळे गेल्या महिन्यात स्थगित झालेली रणजी ट्रॉफी स्पर्धेचा (Ranji Trophy Tournament) 2021-22 हंगामाचा पहिला टप्पा आता 16 फेब्रुवारी ते 5 मार्च खेळला जाणार आहे. देशातील कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे बीसीसीआयला (BCCI) ही सर्वोच्च देशांतर्गत स्पर्धा पुढे ढकलणे भाग पडले होते. या आधीच्या वेळापत्रकानुसार 13 जानेवारीपासून स्पर्धा खेळवली जाणार होती. सूत्रांच्या माहितीनुसार कोलकाता, अहमदाबाद, चेन्नई आणि कटक ही एलिट गटातील सामन्यांची संभाव्य ठिकाणे आहेत. या वेळी प्रत्येकी चार संघांचे आठ गट असतील, 6 संघ प्लेट गट सामने एकाच वेळी होणार आहेत. शिवाय, नवीन वेळापत्रकानुसार चेन्नई, अहमदाबाद, तिरुअनंतपुरम, बेंगलोर, राजकोट, कटक, गुवाहाटी, कोलकाता आणि हैदराबाद या नऊ शहरांमध्ये ग्रुप स्टेजचे सामने होणार आहेत.(Ranji Trophy 2022: रणजी करंडक पुन्हा रुळावर, दोन टप्प्यात होणार स्पर्धा, IPL नंतर बाद फेरी; BCCI सचिव जय शाह यांनी केला शिक्कामोर्तब)
दरम्यान, तामिळनाडू अहमदाबादमध्ये गट सामने खेळणार असून ते झारखंड, छत्तीसगड आणि दिल्ली यांच्या ग्रुपमध्ये आहेत. हैदराबाद आणि त्रिवेंद्रम ही इतर दोन ठिकाणे आहेत. याशिवाय स्पर्धेच्या फॉर्मेटमध्ये बदल करण्यात आला असून प्रत्येकी चार संघांचे आठ गट असतील आणि प्लेट गटात सहा संघ असतील. जूनमध्ये आयपीएल 2022 नंतर बाद फेरी होणार आहे. मात्र, जून-जुलैमध्ये देशातील बहुतांश भागात मान्सून सुरु असल्याने, बोर्डाला बेंगलोर किंवा चेन्नईमध्ये बाद फेरीचे आयोजन करावे लागेल. मार्च 2020 मध्ये रणजी ट्रॉफी फायनल झाल्यापासून भारतात रेड बॉल क्रिकेट झाले नाही. लक्षात घ्यायचे की बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी शुक्रवारी सांगितले होते की पुढे ढकललेली रणजी ट्रॉफी या वर्षी दोन टप्प्यात आयोजित केली जाईल.
गेल्या मोसमात रणजी करंडक रद्द झाल्याची भरपाई मिळालेल्या देशांतर्गत क्रिकेटपटूंनी बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गेल्या आठवड्यात रेड-बॉल स्पर्धा दोन टप्प्यात होणार असल्याची घोषणा केल्यावर आनंद व्यक्त केला होता. या वर्षी देशांतर्गतची सर्वात मोठी स्पर्धा दोन टप्प्यात होणे आवश्यक आहेत कारण बीसीसीआयने 27 मार्चपासून आयपीएलचे आयोजन करण्याची देखील योजना आखली आहे आणि दोन मोठ्या स्पर्धांचे आयोजन एकाच वेळी करणे व्यावहारिकदृष्ट्या शक्य होणार नाही. खेळाडूंची उपलब्धता देखील एक समस्या ठरू शकते.